JOIN US
मराठी बातम्या / Viral / दुकानात बसलेला मुलगा; इतक्यात छतावरुन कोसळला कोब्रा अन्...; धडकी भरवणारा VIDEO

दुकानात बसलेला मुलगा; इतक्यात छतावरुन कोसळला कोब्रा अन्...; धडकी भरवणारा VIDEO

हा मुलगा पान शॉपमध्ये बसलेला असतो, इतक्यात एका उंदराचा पाठलाग करत साप (Snake Video) छतावरुन दुकानात पडतो. सापाला पाहताच हा मुलगा तिथून पळ काढतो

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दिसतं, की एका मुलाच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. हा मुलगा पान शॉपमध्ये बसलेला असतो, इतक्यात एका उंदराचा पाठलाग करत साप छतावरुन दुकानात पडतो. सापाला पाहताच हा मुलगा तिथून पळ काढतो. या भयंकर घटनेचा व्हिडिओ (Shocking Video of Snake) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घराजवळ दबा धरून बसला होता साप, महिला बाहेर येताच…; खतरनाक दृश्य CCTV मध्ये कैद व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक मुलगा पान शॉपमध्ये येऊन बसतो. यादरम्यान त्यावर छतावर काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं. वरती पाहताच हा मुलगा दुकानातून बाहेर पळ काढतो. यानंतर काहीच सेकंदात दुकानात एक उंदीर पडतो आणि त्यापाठोपाठ एक मोठा साप खाली पडतो. सुदैवानं हा साप मुलाच्या अंगावर पडला नाही. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रायसेनमधील असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

कचऱ्याच्या वादावरून महिला भिडल्या; जोरदार हाणामारीचा VIDEO VIRAL ट्विटरवर हा व्हिडिओ (Twitter Video) भारतीय जनता पक्षाचे नेता हितानंद शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, की देव तारी त्याला कोण मारी. त्यांनी दिलेल्या कॅप्शननुसार, व्हिडिओ मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील आहे. हा व्हायरल व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की मारणाराही देवच आणि वाचवणाराही देवच आहे. तर, आणखी एकानं लिहिलं, की उंदरामुळे या मुलाचा जीव वाचला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या