विमानातील भांडणाचा व्हिडीओ
नवी दिल्ली, 27 एप्रिल : अनेकजण विमानाने प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान विमानात अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडतात. अनेकवेळा या घटनांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. आपण विचारही करु शकत नाहीत अशा घटना विमानामध्ये घडतात. सध्या विमानातील घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, विमानात भांडणं सुरु आहेत. एकाच्या हातात काचेची बाटलीही पहायला मिळाली. विमानातील वातावरण बिघडल्यानं विमानाची एमर्जेन्सी लॅंडिंग करावी लागली. विमान पुन्हा सुरु झाल्यावर त्या ग्रुपने पुन्हा वाद सुरु केला. त्यामध्ये खिडकीही तुटली. जेव्हा विमान थांबवलं गेलं तेव्हा पोलिसांनी वाद घालणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं. हा व्हिडीओ सध्या सोशल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हेही वाचा - उन्हाळ्याच्या तडाख्याने माकडेही करु लागली स्विमिंग, मजेशीर Video व्हायरल @fulovitboss नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर कमेंट येत असून लोक राग व्यक्त करत आहेत. ताब्यात घेतलेल्या 23 वर्षीय तरुणीला संपत्ती नुकसान, सार्वजनिक ठिकाणी गैरव्यवहार, मुद्दूमून दुसऱ्यांची सुरक्षा संकटात आणण्याचे आरोप लावण्यात आले आहेत.
दरम्यान, विमानात अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा विचित्र घटना घडल्या आहेत. ज्यामुळे इतर प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.