JOIN US
मराठी बातम्या / Viral / चिमुकल्या हातात धरली GUN आणि...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक; म्हणाले, 'मृत्यूशी खेळतोय हा मुलगा'

चिमुकल्या हातात धरली GUN आणि...; VIDEO पाहून नेटिझन्स शॉक; म्हणाले, 'मृत्यूशी खेळतोय हा मुलगा'

लहान मुलाने आपल्या छोट्याशा हातात बंदूक धरून जे केलं ते पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे.

जाहिरात

आराम मिळेल याची काळजी घ्या - मुलाचा ताप बरा होण्यासाठी अनेक पालक पंखे, एसी बंद करून त्याला भरपूर कपडे घालायला लावतात. असे करू नका. त्याच्या आरामाची काळजी घेतली तर बरे होईल. यासाठी पंखा बंद करण्याऐवजी तो कमी करा जेणेकरून मुलाला आरामात झोपता येईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 मार्च : मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतात ना. लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. अगदी मोठ्या माणसांनाही जे शक्य नाही ते ही मुलं करून दाखवतात. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने असं काही करून दाखवलं आहे, जे पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे (Kid Sharp Shooter) . लहान मुलाने आपल्या चिमुकल्या हातात एक बंदूक धरली. त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. हातात बंदूक धरून त्याने केलेलं करतब कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक लहान मुलगा उभा आहे. हातात एक बंदूक आहे. बंदूक घेऊन तो निशाणा साधण्याच्या तयारीत आहेत. भिंतीवर असलेल्या ट्युब लाइट्सच्या दिशेने त्याने आपला निशाणा लावला आहे. टार्गेट फिक्स होताच तो लगेच फायर करतो. पहिलाचा निशाणा लावतो आणि लाइट्स जाते. हे वाचा -  हे भयानक आहे! हायवेवर इतका Dangerous Bike Stunt; धडकी भरवणारा Video आता या मुलाच्या हातातील बंदूक खरीखुरी नव्हे तर खेळण्यातील आहे, हे तर तुम्हाला समजलंच असेल. पण या खेळण्यातील बंदुकीने हा होईना त्याने लावलेला नेम एखाद्या शार्प शूटरसारखा परफेक्ट आहे.

संबंधित बातम्या

deo.hieukieugi नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. इतका लहान मुलगा इतका अचूक नेम कसा काय साधू शकतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हे वाचा -  शिक्षक असावा तर असा! होमवर्क न करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला ‘गोड शिक्षा’ यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. बहुतेकांनी या मुलाचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूझरने ‘हा लहान मुलगा मृत्यूशी खेळत आहे’, अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘या छोट्या शार्पशूटरला घरात शाबासकी मिळेल की नाही माहिती नाही पण ट्युबलाइट फोडण्यासाठी त्याला ओरडा नक्की पडेल ही मी दाव्याने सांगतो’, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या