JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर सुसाट धावत सुटला चिमुकला, भरधाव वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

रस्त्यावर सुसाट धावत सुटला चिमुकला, भरधाव वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

गाडी इतकी वेगात होती की चिमुकल्याला वाचवणयासाठी वेगावर नियंत्रण मिळणंही शक्य नव्हतं पण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 ऑगस्ट : एखादी कार (Car) भऱधाव वेगाने (Car in speed) येत असेल आणि अशा गाडीसमोर चिमुकला (Children car accident) आला तर काय होईल… कल्पना करूनच अंगावर काटा येतो. अशाच अपघाताचा (Car accindent) एक व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला धडकी भरेलच (Shocking car accident video). पण व्हिडीओच्या शेवटी जे घडलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल पण एक मोठा श्वासही घ्याल (Shocking video). रस्त्या ओलांडताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहून हळूहळू ओलांडायचा असतो. पण एक चिमुकला मात्र कुठेही न पाहता थेट रस्त्यावरून पळत सुटला आणि दुसऱ्या बाजून अति वेगाने कार आली. पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता. पाऊस पडला आहे. पावसामुळे रस्ता ओला झाला आहे. एक मुलगा रस्त्यावरून धावत येताना दिसतो. तो थेट धावतच सुटतो. इतक्यात समोरून एक कार वेगाने येते. मुलगा जेव्हा रस्त्याच्या मध्ये येतो तेव्हा त्याचं लक्ष त्या गाडीकडे जातं पण तो थांबत नाही तर गाडीपासून वाचण्यासाठी म्हणून गाडीकडे पाहतच पळू लागतो. पण गाडीचा वेग इतका असतो की गाडी येण्याआधी मुलगा रस्ता क्रॉस करूच शकत नाही. हे वाचा -  अंडरविअर घालून मासे पकडताना प्रायव्हेट पार्टला लटकला खेकडा आणि… Shocking video मुलगा रस्त्याच्या पलिकडे येणार इतक्यात गाडीच त्याच्या जवळ येते. मुलगा रस्त्यावर कोसळतो. मुलासोबत काय झालं असेल अशीच धाकधूक आपल्या मनात येते. पण सुदैवाने मुलाला काहीही झालं नाही. तो पूर्णपणे सुखरूप आहे. गाडी त्याला अगदी चिकटून पुढे निघून जाते. मुलगा पुन्हा उठतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येतो. त्याच्या हातालाही दुखापत झाल्याचं दिसतं. नंतर जी गाडी त्याच्या बाजूने गेली तीच गाडी पुन्हा मागे येते. त्यातून दोन तरुण बाहेर पडतात आणि ते त्या मुलाला काही झालं तर नाही ना याची खात्री करून घेतात. ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे या मुलाचा जीव वाचला आहे. गाडी इतकी वेगात होती की वेगावर नियंत्रण मिळवून ब्रेक लावणं शक्य नव्हतं. पण मुलाला वाचवायचं होतं. त्यामुळे मुलगा रस्ता ओलांडत असताना दिसताच गाडीने आपली दिशा किंचितशी बदलली. गाडी क्रॉस होऊन पुढे गेली. ड्रायव्हरच्या या हुशारीमुळे चिमुकला थोडक्यात बचावला. तो मरणातून वाचला आहे.  त्यामुळे या ड्रायव्हरचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे. हे वाचा -  पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग…; धक्कादायक घटनेनं खळबळ ही घटना कुठली आहे माहिती नाही. पण अपघाताचं हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जॅट लाइफ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या