मुंबई, 04 ऑगस्ट : मांजरांना (Cat) नॉनव्हेज खायला किती आवडतं हे काही सांगायला नको. त्यावर त्या तावच मारतात. पण कधी कोणत्या मांजराला आपली फेव्हरेट रेसिपी (Cat cooking) बनवताना पाहिलं आहे. सध्या अशाच एका मांजराचा (Cat making recipe) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिने स्वतःसाठी चक्क ऑमलेट बनवलं आहे (Cat made omelette). ऑनलाईन व्हिडीओ (Online recipe video) पाहून एका मांजराने रेसिपी बनवली आहे. मांजराचं कुकिंग स्किल (Cat cooking) पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल आणि या कॅट शेफच्या (Cat chef) प्रेमातच पडला.
पफ इन्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता, मांजर एक ऑनलाइन रेसिपी व्हिडीओ पाहताना दिसते आहे. त्यामध्ये ती ऑमलेटची रेसिपी पाहते आहे. ही रेसिपी तिला खूपच आवडते. त्यामुळे ती स्वतः बनवण्याचा प्रयत्न करते. हे वाचा - आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO जसं व्हिडीओत दाखवलं आहे तसं ती करते आणि फायनली तिची रेसिपी तयार होते. मांजराने बनवलेलं ऑमलेट तिनं व्हिडीओत पाहिल्याप्रमाणे हुबेहुब होत नाही. त्यामुळे ती थोडी नाराजच दिसते आहे. पण असो तिने केलेला प्रयत्न मात्र फसलेला नाही. किमान खाता येईल असं ऑमलेट तरी तिनं बनवलं आहे. त्यामुळे तिच्या या कुकिंग टॅलेंटचं कौतुक करायला हरकत नाही. हे वाचा - 20 आवाज काढत चालली झुकझुक आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO शिवाय नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहून तिला काही टीप्सही दिल्या आहेत. काहींनी तिला पॅनवर तेल टाकण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. तुम्ही या व्हिडीओबाबत काय म्हणाल, आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.