चित्त्याने झेप घेत इम्पालाची मान पकडली
नवी दिल्ली 25 जून : जंगलाचा एक नियम आहे, इथे ताकदवर प्राणी आपल्यापेक्षा लहान आणि कमजोर प्राण्यांना आपली शिकार बनवतात. त्यामुळे इतर प्राण्यांना आपला जीव वाचवण्यासाठी आणि जगण्यासाठी प्रयत्न क्षणी अतिशय सावध राहावं लागतं. लहान प्राण्यांचा जीव नेहमीच धोक्यात असतो. चित्ता, वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्त्र प्राणी या प्राण्यांवर हल्ला करता आणि यांच्या तावडीत सापडलेल्या प्राण्यांचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. गरुडाने फक्त एका पंजातच दुसऱ्या पक्षाला उचलून नेलं; शिकारीचा असा VIDEO कधी पाहिलाय का? जंगली प्राणी बहुतेक वेळा पाठीमागून हल्ला करताना दिसतात. यामुळे समोरच्या प्राण्याला ते आल्याचा अंदाज लवकर येत नाही. समोरून वार केल्यास शिकार हातातून निसटण्याची भीती त्यांना असते. लेटेस्ट साइटिंग्स नावाच्या यूट्यूब अकाऊंटवर नुकताच जंगलातील असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना असं दृश्य दिसलं, की ते थक्क झाले.
व्हिडिओमध्ये दिसतं, की पर्यटकांच्या गाड्या जंगल सफारीसाठी आल्या आहेत. यावेळी पर्यटकांना असं दृश्य पाहायला मिळालं, ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल. गाड्यांना पाहून डझनभर इम्पालांनी पळायला सुरुवात केली. मादा चित्ताला हे समजताच तिने इम्पालांच्या मागे धावत त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. बाकी इम्पाला तिथून पळून गेले, मात्र एक इम्पाला बीएमडब्ल्यू कारजवळ बसून आराम करू लागलं. मध्येच इम्पाला बीएमडब्ल्यू कारकडे बघताना दिसलं. चित्त्याने याच संधीचा फायदा घेत इम्पालावर हल्ला केला. त्याची मान जबड्यात पकडून त्याला ओढत आपल्यासोबत नेलं. हे सगळं तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी पाहिलं. व्हिडिओमध्ये सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, पर्यटकांच्या गाडीच्या रांगा इतक्या लांब होत्या, जणू एखाद्या शहरातील रस्त्यावर गाड्या चालल्या आहेत. पर्यटक या शिकारीचा व्हिडिओ बनवताना दिसले.