JOIN US
मराठी बातम्या / Viral / शिड्यांवरुन चिमुकला पडणार इतक्या मांजरीनं वाचवले प्राण, संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद

शिड्यांवरुन चिमुकला पडणार इतक्या मांजरीनं वाचवले प्राण, संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती, तर त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण झालं असतं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : प्राण्यांचे तसेच लहान मुलांचे क्यूट व्हिडीओ पाहायला कोणाला आवडत नाहीत? हे व्हिडीओ आपला दिवसभराचा सगळा थकवा विसरायला भागपाडतात. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल. हो, कारण या व्हिडीओत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मांजरीने हा लहान बाळाचे प्राण वाचवले आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. वासराला वाघ पकडणार इतक्यात गायीची एन्ट्री, 10 सेकंदात पलटला संपूर्ण गेम, पाहा Video सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती, तर त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण झालं असतं. येथे एक लहान बाळ एकटच खेळत होतं. तेव्हा ते रेंगाळत शिड्यांजवळ पोहोचलं. हे बाळ या शिड्यांवरुन खाली पडणार, इतक्यात ही गोष्ट तेथे असलेल्या मांजरीच्या लक्षात आली, ज्यानंतर ती मांजर वेळेवर तेथे पोहोचली आणि तिने या बाळाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला.

आधी हे बाळ पाठी जात नव्हतं, पण नंतर मांजराने त्याला मागे ढकललंच. ज्यामुळे हे बाळ मोठ्या संकटातून वाचलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण जेव्हा मूल खोलीतील पायऱ्यांकडे रेंगाळू लागते, तेव्हा पाळीव मांजर कसं त्यावर लक्ष ठेवून त्याचे प्राण वाचवू शकतं? यावर लोकांचा विश्वास बसत नाही.

संबंधित बातम्या

सध्या या व्हिडीओबाबत माहिती मिळाली असून ही घटना 2019 ची असल्याचे आढळून आले आहे, जो केटर्स क्लिप नावाच्या पेजने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, ही घटना ऑक्टोबर 2019 मध्ये कोलंबियामध्ये घडली होती. हा व्हिडीओ आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया युजर्सने मांजराचे कौतुक केले आहे. काहींनी असेही म्हटले की पालक आपल्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी मांजर सोडू शकत नाहीत. मात्र, मांजराची सतर्कता कामी आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या