JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video Viral : TV मध्ये मासा दिसताच मांजरीने घेतली उडी अन्..., घटना पाहून पोट धरून हसाल

Video Viral : TV मध्ये मासा दिसताच मांजरीने घेतली उडी अन्..., घटना पाहून पोट धरून हसाल

एक मांजर टीव्हीवर मासा पाहून त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण त्यानंतर जे घडतं ते खूपच मजेदार आहे.

जाहिरात

मांजरीची टीव्ही स्क्रीनवर उडी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 11 जून : इंटरनेटच्या जगात पाळीव प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकवेळा लोक मजा घेतात, तर दुसरीकडे अनेक वेळा असे व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की प्राणी खरोखर किती निष्पाप आणि भोळे असतात. एक काळ असा होता की जेव्हा लोकांना कल्पनाही नव्हती, की टीव्हीसारखं काहीतरी येईल, ज्यामध्ये देश आणि जगाच्या सर्व गोष्टी सहज पाहता येतील. पण आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. आता फक्त टीव्हीच नाही तर लोक व्हिडिओ कॉलवर समोरासमोर बोलू शकतात. बरं, त्यांनी तयार केलेले हे तंत्रज्ञान मानवाला चांगलंच माहीत आहे, पण प्राणी आणि पक्ष्यांना हे समजत नाही. हेच दाखवणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

ज्यामध्ये एक मांजर टीव्हीवर मासा पाहून त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, पण त्यानंतर जे घडतं ते खूपच मजेदार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, की मांजर एक खतरनाक शिकारी आहे. तिला संधी मिळाली तर ती आपली शिकार सोडत नाही. पण तिला रिअल आणि रीलमधला फरक कोण समजावणार. अनेक वेळा असं घडतं की ते रीलचं जग खरं मानतात. असंच काहीसं या क्लिपमध्येही पाहायला मिळालं. मासे पकडण्यासाठी मांजरीने टिव्हीवर उडी मारली. मांजरीला वाटलं की हे मासे खरोखर तिथे पोहत आहेत.

संबंधित बातम्या

उडी मारताच मांजर टीव्ही स्क्रीनला धडकून खाली पडली. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Figensport नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 13 सेकंदांचा हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत 23 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी लाइकही केला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या