दोरीवर मस्त झोका खेळतेय मांजर
नवी दिल्ली, 8 जून : दिवसेंदिवस सोशल मीडियाची क्रेझ वाढत चालली आहे. लोक आपला बराच वेळ इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्यात घालवतात. सोशल मीडियावर दिवसाला अनेक निरनिराळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धोकादायक, भावुक, थक्क करणारे व्हिडीओ असतात. प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच मांजरीचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये तिचा पराक्रम पाहून तुम्हीलाही हसू आवरणार नाही. सध्या समोर आलेला व्हिडीओ एका मांजरीचा आहे. मांजरीचे अनेक व्हिडीओ, फोटो तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. मात्र नुकताच चर्चेत आलेला हा मांजरीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मांजरीचा हटके अंदाज, अनोखी स्टाईल सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मांजर बांधलेल्या दोरीवर झोका खेळत आहे. पुढच्या दोन पायांनी दोरी पकडून ही मांजर अगदी आरामात झोका खेळत आहे. तिचा हटके अंदाज तुम्हालाही आश्चर्यचकित करेल. मांजरीचा हा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत असून व्हिडीओवर भरपूर प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
@apna.bagadbilla नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी व्हिडीओला चांगली पसंती दर्शवली. दरम्यान, प्राण्याचे, पाळीव प्राण्यांचे असे व्हिडीओ इंटरनेटवर कायमच समोर येतात. खास करुन पाळीव प्राण्यांचे. मांजर आणि कुत्रा हा पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे त्यांचे हटके अंदाज, निरनिराळ्या गोष्टी कायमच लक्ष वेधतात. पाळीव प्राणी हळूहळू कुटुंबातील एका सदस्यासरखेच होऊन जातात. त्यांची सवय होते.