मांजरीचा व्हिडीओ.
मुंबई, 09 एप्रिल : प्राण्यांचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जंगली प्राण्यांची खतरनाक शिकार पाहायला मिळते. तर कधी पाळीव प्राण्यांचं प्रेम. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात भलतंच घडल्याचं दिसून आलं आहे. एका मांजरीचा हा व्हिडीओ आहे. मांजरीने असं काही तरी केलं आहे की ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. जर सीसीटीव्ही नसता तर हे सत्य समजलंच नसतं. मांजरीच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका दुकानातील हा व्हिडीओ आहे. या दुकानात एक मांजर शांत बसलं आहे. पण थोड्या वेळात मांजर असं काही तरी करतं की, जे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं नसतं तर त्याचा आरोप कदाचित दुसऱ्या कुणावर तरी केला असता.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दुकानातील काऊंटवर हे मांजर बसलं आहे. मांजराच्या शेजारी अंड्यांचा ट्रे आहेत. ज्यात बरीचं अंडी आहेत. मांजरीचा हात या अंड्याच्या ट्रेच्या खाली आहे. इतक्यात मांजरीला समोर काहीतरी दिसतं. तशी ती घाबरते आणि घाईघाईत उठून पळण्याचा प्रयत्न करते. VIDEO - या प्राण्यासमोर जंगलाच्या राजाचाही हवा टाईट; पाहताच सिंहांनी ठोकली धूम पळण्याच्या धडपडीत तिच्या हातावर असलेला अंड्याचा ट्रेही पलटतो. त्या ट्रेसकट मांजर काऊंटवरून धाडकन खाली कोसळतं. आता साहजिकच इतक्या उंचावरून अंडी पडली म्हणजे ती फुटली असणारच. त्यामुळे दुकानादाराचं नुकसानही झालं आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथं आसपास कुणी माणूसही दिसत नाही आहे. पण तरी अंडी फुटण्याचा आरोप एखाद्या माणसावर गेला असता. पण सीसीटीव्ही कॅमेऱ्याने अंडी फोडण्याचा गुन्हा करणारा खरा आरोपी टिपला. त्यामुळे सत्य समोर आलं. बाबो! साधासुधा नाही हा रेडा, याच्यासमोर लक्झरी गाड्याही फेल; खासियत अशी की तोंडात बोटं घालाल ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पुरावा, इतकंच कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने तर आपण जज आहोत आणि हे मांजर निर्दोष आहे, असा निकालही दिला आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं, मांजराच्या या गुन्ह्याला तुम्ही काय शिक्षा द्याल ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.