नवी दिल्ली 10 मार्च : अलीकडच्या काही दिवसांत काही वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. याचं कारण असं की वापरकर्ते वन्यजीवांना पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक पाळीव मांजर घराच्या मागच्या अंगणात बाहेर आलेल्या सापाशी लढताना दिसत आहे. मांजरी अतिशय निर्भय प्राणी आहेत. जे आपल्या शरीरापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या प्राण्यांशी लढताना दिसतात. कुत्रा समजून घरी आणला भलताच खतरनाक प्राणी; शेवटी व्यक्तीची झाली भयंकर अवस्था सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये एक मांजर सापाशी लढताना दिसत आहे. सामान्यतः विषारी आणि धोकादायक साप पाहून मनुष्य किंवा प्राणी आपला रस्ता बदलतात. साप समोर दिसला की आपली पावलं आपोआपच मागे जायला सुरुवात होते. अशा परिस्थितीत अचानक आलेल्या सापाला एक मांजर चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर @Artsandcultr नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन मांजरी घराच्या मागील अंगणात दिसत आहेत. ज्यांच्या समोर धोकादायक विषारी साप येतो, ते पाहून मांजरही सावध होते आणि पाय मागे घेत हल्ला करण्याच्या अवस्थेत येऊ लागते. सापाने हल्ला करण्यासाठी तोंड उघडताच विजेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने मांजर सापाला पंजाने मारून दूर फेकून देते.
यानंतर, साप पुन्हा तोंड उघडतो आणि मांजरीकडे जातो. मग मांजरीने सापाच्या तोंडावर आणखी एक जोरदार पंजा मारला आणि त्याला दूर फेकून दिलं. जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो वृत्त लिहिपर्यंत सोशल मीडियावर 3 लाख 65 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. वापरकर्ते मांजरीला धाडसी म्हणत आहेत. तर काहींचं म्हणणं आहे की ही मांजर ब्रूस लीपासून प्रेरित आहे.