गाडी रस्त्याने जात होती, अचानक वीज कोसळली
नवी दिल्ली, 17 जुलै: पावसाळा सुरु झाला आहे. मुसळधार पावसानं अनेक राज्यात हजेरी लावली आहे. कुठे तुफान वारा तर कुठे धो धो पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर अनेक विजाही कडाडत आहेत. नागरिकांना पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचे अनेक फोटो व्हिडीओही समोर आले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये विज कोसळतानाचं भयानक दृश्य कैद झालं आहे. रस्त्यावरुन गाडी जात असताना वीज कोसळली. ही वीज जमिनीवर येत तिचा स्फोट होतो. हे दृस्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर वाहने धावताना दिसत आहेत. मग अचानक वीज जमिनीवर पडते आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका जोरदार होता की कोणीतरी बॉम्ब फोडल्यासारखं दृश्य दिसतंय. कारमधील व्यक्ती समोरचं दृश्य कैद करत असताना अचानक ही घटना घडली आणि ती कॅमेऱ्यात कैद झाली.
@explosionvidz नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 8 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वांना धडकी भरवत असून जोरदार चर्चेत आला आहे. नेटकरी यावर अनेक कमेंट करत असून याविषयी भिती व्यक्त करत आहे.