कारचा भयंकर अपघात.
लखनऊ, 14 डिसेंबर : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. एका कारचा भयंकर अपघात झाला आहे. भरधाव कार डिव्हाइडरला धडकली आणि थेट हवेत उडाली. तिथंच ती गरागरा फिरली. कार अपघाताचा हा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे. आग्रा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. मंगळवारी घडलेली ही घटना आहे. अपघात इतका भयंकर ही पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. एखादा फिल्मी सीन वाटावा असा हा अपघात आहे. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. हे वाचा - अपघातवेळी ‘या’ वस्तूंमुळे वाचू शकतो जीव; समजून घ्या सविस्तर व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक ट्रक रस्त्यावरून जाताना दिसतो. तितक्यात त्याच ट्रकच्या मागून एक भरधाव कार येते आणि ती डिव्हाइडरला धडकते. त्यानंतर कार रस्त्यावरून थेट हवेत जाते. तिथं ती गोलगोल फिरते आणि धाडकन जमिनीवर आपटते. त्यावेळी कारमधून ठिगण्याही निघताना दिसतात.
सर्वत्र धूरच धूर दिसतो. या कारच्या मागून आणखी एक ट्रक येत असतो. सुदैवाने ट्रकचालक वेळीच अचानक ब्रेक मारतो. त्यामुळे ट्रक कारला धडकत नाही. कार आणि ट्रकची टक्कर होत नाही.
अवघ्या 15 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. पण पाहूनच धडकी भरते. यातील चालकांचं, प्रवाशांचं काय झालं याची मात्र माहिती नाही. रस्ते अपघात टाळण्यासाठी खालील नियमांचे पालन करा रस्ता ओलांडताना, प्रथम उजवीकडे, नंतर डावीकडे आणि नंतर उजवीकडे पाहून रस्ता ओलांडा. फक्त झेब्रा लाईनवरच रस्ता ओलांडावा. चालताना किंवा रस्ता ओलांडताना कानात इअरफोन लावून चालू नका. वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि विहित वेग मर्यादेत चालवा. दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्यांनी नेहमी हेल्मेट घालावे. कार किंवा इतर चारचाकी किंवा मोठ्या वाहनांचे चालक आणि प्रवाशांनी नेहमी सीट बेल्ट लावूनच गाडी चालवावी. मद्यधुंद अवस्थेत कधीही वाहन चालवू नका. हे वाचा - रस्त्यावर भांडत होते तरुण, भरधाव वेगात आली कार आणि… Video अंगावर काटा आणणारा वाहतूक नियम आणि चिन्हे पाळा. डावीकडे आणि उजवीकडे वळताना, थांबताना आणि गती कमी करताना सिग्नल देण्याची खात्री करा. वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी रुग्णवाहिका जाण्यासाठी मार्ग सोडावा. कोणत्याही वाहनातून उतरताना, नेहमी वाहन बाजूला वळवा आणि नेहमी डाव्या बाजूने उतरा. दरवाजे उघडताना काळजी घ्या. रस्त्याच्या डाव्या बाजूला चाला आणि रस्त्याच्या सर्व चिन्हांचे अनुसरण करा. रस्त्याच्या दुभाजक/चौकात येण्यापूर्वी वाहनाचा वेग कमी करा आणि उजवीकडे आणि डावीकडे पहा आणि ते ओलांडण्यापूर्वी काळजी घ्या. वाहन चालवताना सेल्फी घेऊ नका, त्यामुळे अपघात होऊ शकतो. वाहन चालवताना शांतपणे आणि संयमाने वाहन चालवा.