नवी दिल्ली 15 एप्रिल : शिक्षक मुलांना केवळ शिकवत नाहीत तर त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची बीजेही पेरतात. एवढंच नाही तर शिक्षक गरजेच्या वेळी मुलांचे प्राणही वाचवतात. न्यू जर्सी येथील ईस्ट ऑरेंज कम्युनिटी चार्टर स्कूलमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं, ज्यात एका शिक्षिकेनं आपल्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवले (Teacher Saved Life of a Student). निसर्गाची अनोखी किमया! फक्त ऑक्सिजनच नाही तर पिण्याचं पाणीही देतं हे झाड; पाहा Viral Video एका शिक्षिकेनं मुलाचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ (Shocking Video Viral) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाण्याच्या बाटलीचं झाकण घशात अडकल्याने या विद्यार्थ्याचा गळा चॉक झाला होता. यानंतर मुलाची काय अवस्था झाली हे आपल्याला व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.
मुलाच्या गळ्यात बाटलीचं झाकणं अडकल्याचं कळताच शिक्षिकेनं वेळ न दवडता तातडीने विद्यार्थ्याच्या गळ्यातील अडकलेलं हे झाकण बाहेर काढलं. व्हिडिओमध्ये दिसतं की विद्यार्थ्याच्या पाठीवर मारत शिक्षिकेनं हे झाकण बाहेर काढते. या शिक्षिकेनं सांगितलं यामुळे मोठी दुर्घटना घडू शकत होती. मात्र असं काहीही झालं नाही, याचा तिला अतिशय आनंद आहे. VIDEO : वृद्ध जोडप्याचं भांडणं थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं; मग पोलिसांनी जे केलं ते पाहून व्हाल अवाक व्हिडिओमध्ये दिसणारा रॉबर्ट स्टोनकर हा विद्यार्थी तिसरीमध्ये शिकतो. हा मुलगा तोंडाने बाटलीचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी झाकण अचानक निघालं आणि त्याच्या घशात अडकलं. यानंतर गळा चॉक झाल्याने त्याला प्रचंड त्रास होऊ लागला. 9 वर्षांच्या या मुलाने वेळ न घालवता ताबडतोब आपल्या शिक्षिकेकडे मदतीसाठी धाव घेतली आणि यामुळे त्याचा जीव वाचला.