JOIN US
मराठी बातम्या / Viral / 10 सेकंदात 'या' फोटोतून हिप्पो शोधून दाखवा आणि तुमची हुशारी सिद्ध करा

10 सेकंदात 'या' फोटोतून हिप्पो शोधून दाखवा आणि तुमची हुशारी सिद्ध करा

एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याचं उत्तर सोडवताना सर्वांचीच हालत खराब झाली आहे.

जाहिरात

सोर्स : सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जुलै : सोशल मीडिया वापरकर्त्यांना ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो खूप आवडतात. यामागचं कारण आहे की यामुळे बुद्धीला चालना मिळते आणि मेंदू चांगल्या प्रकारे काम करतं, म्हणून बहुतांश लोक ते सोडवतात. या अशा फोटोंमध्ये आपल्याला पहिल्याच नजरेत सत्य कळत नाही, परंतू जर नीट पाहिलं तर मात्र याचं सत्य उघड होतं. आम्ही आमच्या वाचकांसाठी वेळोवेळी त्याच्याशी संबंधित चित्रे देखील सादर करतो, जी वाचकांना खूप आवडतात. आता पुन्हा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याचं उत्तर सोडवताना सर्वांचीच हालत खराब झाली आहे. हा व्हायरल फोटो अगदी सामान्य आहे. परंतू या फोटोत एक हिप्पो किंवा पाणघोडा लपला आहे, जो तुम्हाला शोधून काढायचा आहे. परंतू बहुतांश लोकांना तो दिसत नाहीय. Optical Illusion : दोन समान चित्रांमध्ये 3 फरक शोधण्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारणार का? हा एक पार्कमधील फोटो आहे ज्यामध्ये काही लोक जॉगिंग करत आहेत, तर काही लोक सायकल चालवत आहेत. उद्यानाचे दृश्य अतिशय सुंदर आहे. पण या लोकांमध्ये एक पाणघोडा देखील लपला आहे. चला तुमच्याकडे 10 सेकंद आहे, पाहा तुम्हाला त्याला शोधता येतंय का ते. लाख प्रयत्न करूनही या चित्रात हिप्पो दिसला नसला तरी काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला ते शोधण्यात मदत करू. सर्व प्रथम, चित्र काळजीपूर्वक पहा. प्रत्येकाकडे टक लावून पाहा. शेवटी सायकल घेऊन आलेल्या मुलाकडे पाहा. त्याचे केस काळजीपूर्वक पहा, त्यात हिप्पोचे चित्र लपलेले तुम्हाला दिसेल. तोच आहे तुमचा हिप्पो. सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये हिप्पो ज्या प्रकारे लपला आहे, ते खरोखरच आश्चर्यकारक आहे. तुमच्या मित्रांना हे पाठवा आणि पाहा त्यांना तो शोधता येतोय का.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या