टॅटू
नवी दिल्ली, 11 एप्रिल : आजकाल टॅटू काढण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. विशेषत: तरुणांमध्ये टॅटू काढण्याची जास्त क्रेझ आहे. फॅशन, स्टाईल आणि सौंदर्यासाठी लोक शरीरावर टॅटू काढून घेतात. स्वत: ची ओळख निर्माण करण्याची आणि ती जपण्याची इच्छा, हे टॅटू काढण्याचं सर्वांत लोकप्रिय कारण आहे, असं अभ्यासात आढळलं आहे. टॅटूमुळे स्वत:चं वेगळेपण सिद्ध करता येतं. या टॅटूंचा संबंध केवळ स्टाईल आणि फॅशनशी नसून, त्याचा माणसाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
आजकाल, टॅटू बनवण्यासाठी डिझाइनचे आणि रंगांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळी फक्त निळ्या रंगाचे गोंदण किंवा टॅटू दिसत होते. टॅटू काढण्यापूर्वी आपण योग्य प्रकारे रिसर्च न केल्यास टॅटू शरीरासाठी खूप विषारी ठरू शकतात. टॅटू शाईवर नियमन नाही आणि यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. “टॅटू काढून घेण्याचं प्रमाण अधिकाधिक सामान्य होत असताना, त्यांच्याशी संबंधित धोके समजून घेणं महत्त्वाचं आहे. टॅटूची शाई विषारी असू शकते हे बहुतेकांना माहीत नसते. जर त्यांना हानिकारक शाईबाबत माहिती असेल तर ते टॅटू काढून घेणार नाहीत,” अशी माहिती न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी दिली. अंजली यांनी सांगितलं की, जेव्हा आपण आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर टॅटू शाई इंजेक्ट करतो तेव्हा आपल्या त्वचेमध्ये आर्सेनिक, बेरिलियम आणि शिसं यांसारख्या अनेक धातूंचा प्रवेश होतो. हेही वाचा - Worlds poisonous garden : जगातील सर्वात विषारी गार्डन; इथे श्वास घ्याल तर… हे सर्व धातू मानवी शरीरासाठी घातक असतात. या धातूंमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, फुफ्फुसाचे आजार, यकृत व मूत्रपिंडाचे आणि त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. टॅटूची शाई त्वचेच्या पृष्ठभागावर टोचल्यानंतर ती प्राथमिक सुगंधी अमीनो तयार करते. सुगंधी अमीनो एक प्रकारचे कार्सिनोजेनिक असतात. त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. हेही वाचा - दार उघडलं अन् बाथरूममध्ये 7 फूट मगर; अख्खं गाव हादरलं, थरकाप उडवणारा Video ‘द रिव्ह्यू ऑफ जनरल सायकॉलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार टॅटू काढण्याच्या प्रथेला पाच हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे. त्यामुळे टॅटू काढून घेण्यात काही चुकीचं नाही. मात्र, योग्य रितीनं टॅटूची शाई न निवडल्यास त्याचे त्वचेवर आणि आरोग्यावर परिणाम होतात. अॅलर्जीदेखील होऊ शकते. म्हणूनच, टॅटू काढण्यापूर्वी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. हौसेसाठी एखादी गोष्ट करताना आरोग्य नीट राहील याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.