नवी दिल्ली, 11 एप्रिल : सोशल मीडियावर अनेक भयानक प्राण्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात. कधी कुठे प्राणी आढळून येईल आणि हल्ला करेल याचा काही नेम नाही. त्यामुळे प्राण्यांच्या बाबतीत अनेक लोकांच्या मनात भीती बसली आहे. अशातच सध्या समोर आलेल्या घटनेत बाथरूममध्ये चक्क सात फुटांची मगर दिसली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील एका गावात घरातील बाथरूममध्ये 7 फूट लांबीची मगर आढळल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. बाथरूममध्ये मगर असल्याची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ वन्यजीव एसओएसला दिली. ही टीम आग्रापासून लांबचा प्रवास करून गावात पोहोचली आणि 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर मगरीची सुटका करता आली. अशीच दुसरी घटना घडल्याने गावातही भीतीचे वातावरण आहे.
चौकशी केली असता, जवळच्या तलावातून मगर इमारतीत शिरल्याचे आढळून आले. बचाव पथकाने अखेर मगरीला योग्य नैसर्गिक ठिकाणी सोडले. संचालक संवर्धन प्रकल्प, वन्यजीव एसओएस बैजुराज एमव्ही यांनी सांगितले की, एका महिन्यात आम्ही फिरोजाबाद येथून दोन मगर पकडली आहे. जवळच कालव्यामुळे मगरी कधीकधी जलाशयातून भटकून जमिनीवर येतात. पण बचावाचे मोठे श्रेय स्थानिक लोकांना जाते. कारण त्यांनी मगर आढळताच अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि योग्य पाऊल उचलले. त्यामुळे मगरीला सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश आले.
दरम्यान, मगरींचं मानवी वस्तीकडे निघण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वीही अशा घटना समोर आल्या आहेत. मगर ही पाण्यातली भयनक शिकारी असल्याचं म्हटलं जातं. मगरीच्या तावडीतून एखादी शिकार क्वचितच सुटत असेल. त्यामुळे लोकांच्या मनात मगरीविषयी भीती आहे.