JOIN US
मराठी बातम्या / Viral / Call Girl Photo Viral : सरकारी अधिकाऱ्याला कॉल गर्लचं प्रेम पडलं महागात, फोटो सोशल मीडियात व्हायरल

Call Girl Photo Viral : सरकारी अधिकाऱ्याला कॉल गर्लचं प्रेम पडलं महागात, फोटो सोशल मीडियात व्हायरल

प्रेम कोणाला केव्हाही, कुणावरही होऊ शकतं. पण ते प्रेम महागातही पडू शकतं. असं म्हणण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडलेली एक घटना होय.

जाहिरात

कॉल गर्लच्या प्रेमात पडला विवाहित सरकारी कर्मचारी, पोलिसांनी अटक करून तुरुंगात केली रवानगी

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जानेवारी : प्रेम कोणाला केव्हाही, कुणावरही होऊ शकतं. पण ते प्रेम महागातही पडू शकतं. असं म्हणण्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडलेली एक घटना होय. इथं घडलेली एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. पोलिसांनी एका सरकारी कर्मचाऱ्याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. त्या कर्मचाऱ्याविरोधात एका कॉलगर्लने तक्रार दिली होती. आझमगढहून प्रयागराजला आलेल्या या कॉलगर्लने एका तरुणाशी लग्न केलं होतं आणि नंतर या सरकारी कर्मचाऱ्याला प्रेमात फसवलं. पण नंतर दोघांमध्ये वाद झाला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

सेक्स रॅकेट व्यवसायातील एका तरुणीला आझमगढ पोलिसांनी पकडलं होतं. काही दिवसांपूर्वी ती प्रयागराजमध्ये आली होती आणि इथेही तेच काम करत होती. समाजात राहायला तिने एका तरुणाशी लग्नही केलं. अशातच तिची भेट एका सरकारी कर्मचाऱ्याशी झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि तरुणी आपल्या पतीला दूर करू लागली. तो सरकारी कर्मचारी हिच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हे ही वाचा :  लग्नात पाहुण्या म्हणून आल्या आणि सर्वांसमोर पैसे घेऊन पळाल्या, घटना CCTV त कैद

संबंधित बातम्या

अशातच त्याच्या पत्नीचं गंभीर आजाराने निधन झालं. तिच्या अंत्यसंस्काराला ही कॉल गर्ल पोहोचली आणि आपण सरकारी कर्मचाऱ्याची पत्नी असल्याचं लोकांना सांगितलं. हे ऐकताच उपस्थित सर्व जण गोंधळात पडले. त्यानंतर ही तरुणी आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यामध्ये चांगलाच वाद झाला. तरुणीने आपल्या फोनमध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी तिचा फोन हिसकावून घेतला. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने पोलीस स्थानकात जाऊन चोरीची तक्रार दिली.

जाहिरात

या प्रकारानंतर तिचा आणि त्या कर्मचाऱ्यातील वाद वाढला. मग त्या कर्मचाऱ्याने तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. अशातच तिने पुन्हा त्याची पत्नी असल्याचा दावा केला आणि त्यांचं जोरदार भांडण झालं. परिणामी त्या तरुणीने पोलिसांमध्ये चोरीसह जीवे मारण्यासाठी हल्ला केल्याचाही आरोप करत तक्रार दिली. खरं तर पोलिसांना या प्रकरणातील सत्य माहीत होतं.

हे ही वाचा :  महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक

जाहिरात

पण याच दरम्यान त्या तरुणीने मुख्यमंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि आपल्याला न्याय न मिळाल्यास जीवाचं बरंवाईट करून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि त्या सरकारी कर्मचाऱ्याला तुरुंगात टाकलं आहे. एकंदरीतच त्या कर्मचाऱ्याला या कॉल गर्लचं प्रेम चांगलंच महागात पडलं असं म्हणायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या