स्विमिंग पूलमध्ये म्हशी पोहायला आल्या
नवी दिल्ली, 24 मे : उन्हाळा सुरु आहे आणि सर्वत्र प्रचंड ऊन, गरमी जाणवत आहे. दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या उन्हाला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे बाहेर पडण्यासही लोक टाळाटाळ करत आहे. माणसांचीच अशी अवस्था झालीये तर प्राण्यांचं काय झालं असेल? त्यांनाही उन्हाच्या तडाख्याचा त्रास होतोय. उन्हापासून वाचण्यासाठी तेही काहीतरी जुगाड करत आहेत. नुकताच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये म्हशींनी भर उन्हात गार होण्यासाठी एका व्यक्तीच्या स्विमींपीलवर डल्ला मारलाय. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला असून चांगलाच व्हायरल होतोय. म्हशींचा कळप एका जोडप्याच्या नवीन स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना आढळला. त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. हे नेमकं काय घडलं याविषयी जाणून घेऊया.
जवळच्या शेतातून 18 म्हशी पळून गेल्या आणि अचानक त्या जोडप्याच्या घराबाहेर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या. सकाळचे हे दृश्य लोकांना थक्क करणारं आहे. पण या जोडप्यासाठी हे दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. अनेक म्हशींनी एसेक्स स्विमिंग पूलमध्ये पहाटे डुबकी मारली. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता की, अनेक म्हशी त्या स्विमिंग पूलमध्ये पोहोचल्या आणि एकामागून एक उड्या मारू लागल्या. जोडप्याच्या म्हणण्यानुसार, त्यांना 25,00,000 रुपयांचे नुकसान झाले. अँडी आणि लिनेट स्मिथ असं जोडप्याचं नाव आहे.
आठ म्हशी स्विमिंग पूलमध्ये पडल्या आणि कुंपण आणि फ्लॉवर बेड उध्वस्त केला. मात्र, तेथून म्हशी पळून गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. @thandojo नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 10 सेंकदांचा हा व्हिडीओ असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.