JOIN US
मराठी बातम्या / Viral / बिबट्या-मगरीची सुरू होती तुफान फायटिंग, मध्येच वाऱ्याच्या वेगाने धावत आला रेडा अन्...; थरारक VIDEO

बिबट्या-मगरीची सुरू होती तुफान फायटिंग, मध्येच वाऱ्याच्या वेगाने धावत आला रेडा अन्...; थरारक VIDEO

बिबट्या, मगर आणि रेड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

मगर-बिबट्याच्यामध्ये आला रेडा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 एप्रिल :  प्राण्यांच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. बिबट्या आणि मगरी च्या फायटिंगचा हा व्हिडीओ. दोघेही खतरनाक प्राणी . या खतरनाक प्राण्यांची तुफान फायटिंग सुरू असताना अचानक एक रेडा त्यांच्या मध्ये पडला, त्यानंतर जे घडलं ते थरारक आहे. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रातच ताकदवान असतो हे या व्हिडीओत दिसून येतं आहे. सिंह जंगलाचा राजा असेल तर पाण्यात मगरीचं साम्राज्य असतं. अशी मगर पाण्याबाहेर आली. त्याचवेळी जमिनीवर असलेल्या वेगवान शिकारी बिबट्याची नजर तिच्यावर पडली. मगर आणि बिबट्या दोघंही आमनेसामने आले. दोघांमध्ये चांगलीच फाइट सुरू झाली. त्याचवेळी त्यांच्यामध्ये एक रेडाही आला.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मगर आणि बिबट्या एकमेकांवर तुटून पडले आहेत. एरवी पाण्यात बिबट्याची मान आपल्या जबड्यात धरणाऱ्या मगरीची मान जमिनीवर मात्र बिबट्याच्या जबड्यात आहे. बिबट्याच्या तावडीतून सुटण्यासाठी ती धडपड करते आहे. पण बिबट्या काही तिची मान आपल्या तोंडातून सोडत नाही. त्याचवेळी समोरून एक रेडा चालत येताना दिसतो. OMG! मांजरीच्या हातून हे काय घडलं? CCTV नसता तर सत्य समजलंच नसतं; Watch Video मगर आणि बिबट्याला लढताना पाहून त्यालाही जोश चढतो आणि वाऱ्याच्या वेगाने तो त्यांच्या दिशेने धावत येतो. तो त्यांच्या जवळ पोहोचतो. त्यांना आपल्या पायांनी तुडवणार, शिंगानी उडवणार तोच दुसऱ्या बाजून दुसरा रेडा धावत येतो आणि त्याला अडवतो. आपल्या दोन्ही शिंगानी त्याला बाजूला नेतो. बिबट्या आणि मगरीपासून दूर करतो. त्यानंतर त्याच्यामागून आणखी काही रेडे त्या दिशेने पळताना दिसतात. मगर आणि बिबट्या या खतरनाक प्राण्यांच्या लढाईत तू पडू नकोस, असंच त्यांनी आपल्या साथीदाराला सांगितलं. रेड्यांचा कळप वेगाने बाजूने जाऊनही बिबट्या-मगरीला काहीच नाही. दोघंही डगमगले नाहीत. त्यांच्यातील लढाई शेवटपर्यंत सुरूच होती. VIDEO - या प्राण्यासमोर जंगलाच्या राजाचाही हवा टाईट; पाहताच सिंहांनी ठोकली धूम एकंदर पाहता या फायटिंगमध्ये बिबट्यानेच बाजी मारलेली दिसते आहे. कारण मगरीत फार हालचाल दिसत नाही आहे, तिच्यात जीवच राहिला नाही आहे.

संबंधित बातम्या

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या