JOIN US
मराठी बातम्या / Viral / नवरीच्या मेव्हण्याने केली चेष्टा; नवरदेवाने वाजवली कानाखाली, स्टेजवरील हाणामारीचा Video व्हायरल

नवरीच्या मेव्हण्याने केली चेष्टा; नवरदेवाने वाजवली कानाखाली, स्टेजवरील हाणामारीचा Video व्हायरल

भारतीय लग्न कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. लग्नांमध्ये नेहमीच हटके पद्धती, विधी, मजा-मस्ती, पहायला मिळते.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 18 एप्रिल : भारतीय लग्न कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. लग्नांमध्ये नेहमीच हटके पद्धती, विधी, मजा-मस्ती, पहायला मिळते. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांची साथ असल्यामुळे या सोहळ्याला आणखीनच शोभा येते. मात्र कधी कधी या सोहळ्यात कोणामुळे किंवा कशामुळे तरी विघ्न पडते. आत्तापर्यंत लग्नांमध्ये अनेक विचित्र घडल्याचं समोर आलं आहे. काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले. अशातच यामध्ये आणखी एक भर पडली असून लग्नामधील थक्क करणारी घटना समोर आली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू आणि वर दोघेही त्यांच्या लग्नाच्या मंचावर शांतपणे बसलेले दिसत आहेत. स्टेजभोवती उभे राहून मित्र आणि नातेवाईक मजा करत आहेत. काही वेळाने एक माणूस स्टेजवर चढतो आणि वराच्या मागे उभा राहतो. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेलाही तो बोलावतो. तो पहिल्यांदा नवरदेवाची पगडी वर उचलतो. त्याचं हे वागणं नवरदेवाला आवडत नाही मात्र तो शांत राहतो. हेही वाचा - शास्त्रज्ञांनी डॉल्फिनवर लावला कॅमेरा, समुद्रातील आश्चर्यकारक दृश्य झालं कैद, पाहा Video पुढे माणूस नवरदेवाला नोट देतो आणि फोटो काढतो. हे झाल्यावर तो त्याचे गाल जोरजोरात ओढालयला लागतो. पुन्हा अपमान झाल्यामुळे वराला राग येतो. संतापलेला नवरा मुलगा उभा राहतो आणि त्या माणसावर कानाखाली मारतो. वधू आणि इतर काही जण नवरदेवाला थांबवण्यासाठी पुढे येतात. व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे तो व्यक्ती नवरीचा मेव्हणा असल्यातं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, अरहंत शेल्बीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय व्हिडीओवर भरपूर कमेंटदेखील येत आहेत. लग्नांमध्ये अशा मारामारीच्या, भांडणाच्या, विचित्र, मजेशीर अशा प्रकारच्या घटना घडत असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या