Bride Refuses to Marry in Kanpur: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपुरमधून (Kanpur) एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे नवरीने लग्न करण्यास नकार दिला, कारण नवरदेव आपल्यासोबत फोटोग्राफर आणायला विसरला होता. नवरीने लग्नास नकार दिला आहे. संपूर्ण भागात या नवरीची मोठी चर्चा सुरू आहे. कानपूरातील मंगलपूर भागातील घटना… मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरातील एका गावातील आहे. येथील गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न भोगनीपूर येथे राहणाऱ्या तरुणासोबत ठरलं होतं. ‘जयनाला’साठी स्टेज सजवण्यात आला होता. वरात आल्यानंतर नवरीचं कुटुंब स्वागतासाठी आले. यानंतर नवरा-नवरी जयमाला समारंभासाठी स्टेजवर पोहोचले. मात्र जेव्हा नवरीने पाहिलं की, लग्नाच्या आठवणी कैद करण्यासाठी कोणी फोटोग्राफर नाही तर तिला राग आला. यानंतर नवरीने लग्नास नकार दिला. रागाच्या भरात नवरी जयमालाच्या स्टेजवरुन खाली उतरून शेजारी निघून गेली. नवरीच्या कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तीला माझ्या लग्नाची काळजी नाही, तो भविष्यात माझी काळजी कशी करेल. कुटुंबातील ज्येष्ठांनीही तिला समजाण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नाही. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. येथे दोन्ही पक्षांनी आपल्या सहमतीने दिलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू परत करण्यासाठी होकार दिला. शेवटी दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत हे प्रकरण सोडवलं. यानंतर नवरदेव नवरीशिवाय आपल्या घरी निघून गेला.