JOIN US
मराठी बातम्या / Viral / वरात दारात, नवरी जोमात! नवरदेवाला पाहताच झाली सैराट; VIDEO VIRAL

वरात दारात, नवरी जोमात! नवरदेवाला पाहताच झाली सैराट; VIDEO VIRAL

नवरदेवाला पाहताच सुटला नवरीचा स्वतःवरील ताबा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 ऑगस्ट : नवरदेव (Groom) आपल्याला घ्यायला येणार याचा आनंद नवरीला (Bride) असतो. लग्नात (Wedding video) नटूनथटून ती त्याची आतुरतेने वाट पाहत  असते. वरात दारात येताच नवरीच्या (Bride video) बहिणी, मैत्रिणीही तिला चिडवू लागतात. त्यावेळी नवरी हळूच लाजते. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा नवरीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. जी वरात येताच सैराट झाली आणि दाराजवळ जाऊन तिने धिंगाणा घातला (Bride dance). व्हिडीओत पाहू शकता, वरात दारात आल्यानंतर सामान्यपणे नवरीचे आई-वडील नवरदेव आणि वऱ्हाड्यांच्या स्वागतासाठी येतात. पण इथं तर चक्क ही नवरीच वरातीच्या स्वागतासाठी आली.

ती मांडवदारी येऊन उभी राहिली. वरातीत आपल्या नवरदेवाला शोधू लागली. नवरदेव दिसताच तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती तिथंच ठुमके लगावू लागली. हे वाचा -  अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL बॉलिवूड फिल्ममधील गाण्यावर तिने ताल धरला. खलनायक फिल्ममधील  पालखी में होके सवार चली रे, या गाण्यावर ती नाचू लागली.. नाचता नाचता तिने नवरदेवाला हाताने इशारा करून त्यालाही आपल्याजवळ बोलावून घेतलं. नवरदेवही नवरीजवळ आला आणि नवरीसोबत त्यानेही गाण्यावर ठेका धरला. दोघंही नाचू लागले. हे वाचा -  VIDEO - …अन् वहिनीने काठीने चोप चोप चोपलं; भीतीने आईच्या मागे दडून बसला दीर नवरी-नवरदेवाला असं नाचताना पाहून आजूबाजूचे लोकही हसू लागले.  रुचि प्रजापति मलानिया फेसबुक युझरने आपल्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या