JOIN US
मराठी बातम्या / Viral / मैत्रिणींनी केली मस्करी; नवरदेव स्टेजवर रडायला लागला, नवरीने विधी सुरू असतानाच मोडलं लग्न

मैत्रिणींनी केली मस्करी; नवरदेव स्टेजवर रडायला लागला, नवरीने विधी सुरू असतानाच मोडलं लग्न

प्रशांत हा घाबरला आणि मंडपात सर्वांसमोर रडू लागला. वराला असं रडताना पाहून वधूला राग आला. यानंतर तिने लग्नास नकार दिला.

जाहिरात

नवरीने विधी सुरू असतानाच लग्न मोडलं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा 20 जून : लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास असतो. मात्र, काहीवेळा लग्नातच अशा घटना घडतात, ज्यामुळे हा आनंद क्षणात संपतो. अशीच एक ऐनवेळी लग्न मोडल्याची अजब घटना बिहारच्या सारण येथून समोर आली आहे. कोपाच्या पतीलाचे रहिवासी मोतीलाल यांचा मुलगा प्रशांत याची वरात मोठ्या थाटामाटात आली. मुलींनी वरातीचं जोरदार स्वागत केलं. सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं आणि हळूहळू लग्नाचे विधी होत होते. वरमाला समारंभानंतर वधू आणि तिच्या मैत्रिणींना वाटलं की वर गतिमंद आहे. दरम्यान, जसजसे लग्नाचे विधी पार पडत होते, तसतसा वरावरील मैत्रिणींचा संशय अधिकच गडद होत होता. संशयाची पुष्टी करण्यासाठी वधूच्या मैत्रिणींनी वराची चौकशी सुरू केली. हनिमूनच्या रात्रीच पत्नीबद्दल असं काही समजलं की कोर्टात धाव, न्यायालयानेही दिली घटस्फोटाची परवानगी यावर प्रशांत हा घाबरला आणि मंडपात सर्वांसमोर रडू लागला. वराला असं रडताना पाहून वधूला राग आला. यानंतर तिने लग्नास नकार दिला. वधूने स्पष्टपणे सांगितलं की, वराची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी लग्न करणार नाही. मुलीच्या या निर्णयानंतर आनंदाचं वातावरण पूर्णपणे बदललं. मुलगी आणि मुलाकडील लोकांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि संपूर्ण वातावरण तणावपूर्ण बनलं. मुलीच्या या निर्णयाची बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी जमा होऊ लागले. यादरम्यान गावातील वडिलधाऱ्यांनी वधूला समजावून सांगितलं, मात्र तिने न जुमानता लग्न मोडलं. यानंतर मुलीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेल्या वस्तू परत करण्यास सांगितलं आणि परिस्थिती बिघडली. गावातील जाणकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून वातावरण शांत केलं. वधूशिवायच वरात परतली. मुलीच्या या निर्णयाबाबत गावात विविध चर्चा सुरू आहेत. काहीजण या निर्णयाचं समर्थन करत आहेत, तर काहीजण हा घाईने घेतलेला निर्णय असल्याचं म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या