नवी दिल्ली 09 मे : लग्न हा असा क्षण असतो, जो प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय असतो. तो आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी लोक विविध गोष्टी करतात. काहींचा जेवणाच्या मेन्यूवर तर काहींचा मंडप उत्तम पद्धतीने सजवण्यावर भर असतो. सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असल्याने सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Wedding Video) झाल्याचं पाहायला मिळतं. पाठवणीवेळी नवरी नाही, तर नवरदेवच ढसाढसा रडू लागला; VIDEO पाहून समजेल कारण यात कधी पाठवणीचे भावुक करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, तर कधी लग्नातील डान्स आणि मजा-मस्तीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Wedding Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुसळधार पाऊस पडताना दिसतो. यामुळे लग्नाच्या मंडपातही पूर्णपणे पाणी शिरतं. मात्र, तरीही नवरी नवरदेवाला काहीही फरक पडत नाही. पाण्याने भरलेल्या मंडपातच ते लग्नाचे विधी सुरू ठेवतात.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की इथे मुसळधार पाऊस पडत आहे. लग्नमंडपही पूर्णपणे पाण्याने भरला आहे. एक माणूस वायपरने पाणी बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. पाण्याच्या मधोमध खुर्चीवर बसलेला फोटोग्राफरही मंडपात बसून लग्न झालेल्या वधू-वरांचे फोटो काढण्यात व्यस्त आहे. मंडपाच्या आजूबाजूला पाणीच पाणी दिसत आहे, पण वधू-वरांना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. ते पूर्णपणे आपल्या लग्नात मग्न आहेत. हे दृश्य अतिशय मजेशीर आहे. याआधी तुम्ही कधीही असं लग्न पाहिलं नसेल. Ex बॉयफ्रेंडच्या लग्नात पोहोचली गर्लफ्रेंड; नव्या नवरीला पाहून चेहराच पडला, पाहा Video हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओला मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे ‘लग्न तर आम्ही करणारच’. आतापर्यंत हा व्हिडिओ 1.5 मिलियन म्हणजे 15 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर 74 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलं, ‘नवरीचा मेकअप खराब होऊ नये, नाहीतर लग्नच मोडेल.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ‘नक्कीच या दोघांनी कढईमध्ये जेवण केलं असणार, त्यामुळेच यांचा लग्नात पाऊस पडला’. याशिवाय इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.