JOIN US
मराठी बातम्या / Viral / नव्या कोऱ्या कारची ग्रँड एन्ट्री, Video पाहून तुम्हाल हसावं की मालकासाठी दु:खं व्यक्त करावं हेच कळणार नाही

नव्या कोऱ्या कारची ग्रँड एन्ट्री, Video पाहून तुम्हाल हसावं की मालकासाठी दु:खं व्यक्त करावं हेच कळणार नाही

नवीन वस्तूची नेहमीच आपण जीवापाड काळजी घेतो, पण या कारची हालत पाहाता त्याच्या मालकाची काय अवस्था झाली असेल? हे तर त्याचं त्यालाच ठावूक

जाहिरात

Viral Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे एकदा का तुम्ही आलात तर तुम्हाला तुमच्या आवडीचे इतके व्हिडीओ पाहायला मिळतील की तुमचा तासन तास कसा वेळ निघून जाईल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो तसा खतरनाक व्हिडीओ आहे. परंतू तो पाहाताना तुम्हाला हसू देखील आवरणार नाही. हा व्हायरल व्हिडीओ आहे एका कारचा, खरंतर हल्लीच काही दिवसांपूर्वी दसरा झाला. दसऱ्याच्या दिवशी बरेच लोक नवीन वस्तू, तसेच गाडी विकत घेतात. एका व्यक्तीनं देखील तेच केलं. परंतू त्यांच्यासोबत काही भलतंच घडलं. नवीन वस्तूची नेहमीच आपण जीवापाड काळजी घेतो, पण या कारची हालत पाहाता त्याच्या मालकाची काय अवस्था झाली असेल? हे तर त्याचं त्यालाच ठावूक हे वाचा : कुत्र्याने वाघाच्या कानाचा घेतला चावा, पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण, पाहा VIDEO या व्हिडीओच्या सुरुवातीला एक गाडी गेटच्या आता एन्ट्री करत असते. तो पर्यंत सगळं काही ठिक असतं. परंतू त्यानंतर ड्रायव्हरचा गाडीवरील कंट्रोल जातो आणि तो आपली नवीन गाडी, बाजूला पार्क केलेल्या गाड्यांना नेवून ठोकतो. यामुळे या नवीन गाडीचे तर नुकसान होतेच. शिवाय इतर गाड्यांचे देखील नुकसान होते. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. लोक या गाडीच्या मालकासाठी दु:ख व्यक्त करतना दिसले, तर काही लोकांना या हेवी ड्रायव्हरची अशी ड्रायव्हिंग पाहून भीती देखील वाटली आहे.

संबंधित बातम्या

हे वाचा : घरी सुखरुप जाता यावं यासाठी तरुणानं GPS ची मदत घेतली, पण Map नं त्याला मृत्युच्या रस्त्यावर नेलं हा व्हिडीओ Sqn Ldr Vinod Kumar (Retd) नावाच्या अकाउंटवरुन ट्वीवटरवर शेअर करण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘‘काय काय ग्रॅन्ड एन्ट्री आहे?’’ नेटकऱ्यांना ही ग्रँड एन्ट्री आवडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या