मुंबई, 14 मार्च : सध्या बरेच लोक डेटिंग अॅपमार्फत आपला लाइफ पार्टनर शोधतात. पण अशा डेटला भेटताच काही वेळा विचित्र, वाईट आणि धक्कादायक अनुभव येतो. असंच एका तरुणीसोबत घडलं. ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला भेटली. तिने असा ड्रेस घातला होता जो पाहताच बॉयफ्रेंड आऊट ऑफ कंट्रोल झाला आणि त्याने तिच्यासोबत असं काही केलं ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल. एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा विचित्र किस्सा सोशल मीडियावर सांगितला आहे. निक्की जब्स असं या तरुणीचं नाव आहे. डेटिंग अॅप Hinge यावर ती ग्रेग नावाच्या एका तरुणीला भेटली. या स्ट्रेंजर तरुणासोबत ती तीन आठवडे ते रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत असं काही केलं की तिने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. हे वाचा - अजबच! म्हणे, ‘पार्कमध्ये फिरायला गेलो आणि पायच हरवला’, शोधून देणाऱ्याला बक्षीस पोस्टमध्ये ती एका गाडीत बसल्याचं दिसतं आहे. त्या पोस्टवर काही मजकूर लिहिलेला आहे. तिने सांगितलं, तीन आठवड्यांच्या रिलेशनशिपनंतर त्याने पहिल्यांदा आपल्याला वर्क फंक्शनमध्ये तिला बोलावलं. आपल्या पार्टनरला भेटण्यासाठी ती खूप उत्साही होती.
ज्या रिटेल कंपनीसाठी तो काम करत होता. तिथं जाण्यासाठी तयार होण्यासाठी मी 40 मिनिटं घालवली. पण जेव्हा ग्रेगनं सांगितलं की माझ्या ड्रेसमुळे लाज वाटते आहे तेव्हा माझं हृदय तुटलं. त्याने मला घरी पाठवण्यासाठी उबेर कॅब करून दिली. हे वाचा - हाय हिल्स घालून रस्त्यावरच काठी अन् बेल्टने तरुणींची हाणामारी; Shocking Video तिने हाय वेस्ट, पेपर बॅग पँट आणि काळ्या रंगाचं क्रॉप टॉप घातलं होतं. या तरुणीने पूर्ण वीकेंड ग्रेगसोबत घालवला. ती त्याच्यासोबत अनिश्चित काळासाठी राहिल असं म्हणाली होती. पण त्या एका संध्याकाळनंतर ते सर्वकाही संपलं.