JOIN US
मराठी बातम्या / Viral / गर्लफ्रेंडला ट्रॉलिमधून वाऱ्याच्या वेगानं फिरवून सोडून दिलं आणि घडलं भयंकर

गर्लफ्रेंडला ट्रॉलिमधून वाऱ्याच्या वेगानं फिरवून सोडून दिलं आणि घडलं भयंकर

बहुतांश वेळा परदेशातील लोक आपल्या मित्रांसोबत आणि पार्टनरसोबत वाट्टेलत्या लेवलचे प्रँक करताना किंवा त्रास देताना तुम्ही पाहिलं असेल आणि तसंच काहीसं या व्हिडीओत घडलं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मे : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. इथे कधी कधी अशा काही गोष्टी समोर येतात, ज्यापाहून आपल्याला पण धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल आणि तुम्ही विचार करु लागाल की कोणी असं कृत्य कसं करु शकतं. तुम्ही परदेशातील लोकांचे प्रँकचे व्हिडीओ पाहिले असतील. बहुतांश वेळा परदेशातील लोक आपल्या मित्रांसोबत आणि पार्टनरसोबत वाट्टेलत्या लेवलचे प्रँक करताना किंवा त्रास देताना तुम्ही पाहिलं असेल आणि तसंच काहीसं या व्हिडीओत घडलं. ऑनलाईन वाहन चलानमुळे मोडला व्यक्तीचा संसार, नक्की असं काय घडलं? या व्हिडीओत गर्लफ्रेंड आपल्या बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवून मॉलच्या ट्रॉलीमध्ये बसली, तिला या राईडचा रोमांचक आनंद घ्यायचा होता. पण काही क्षणातच हा आनंद दु:खात बदलला कारण तिच्या प्रियकरानं तिच्यासोबत असंच काहीसं कृत्य केलं आहे.

संबंधित बातम्या

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियकर त्याच्या प्रेयसीला शॉपिंग कार्टमध्ये बसवतो आणि नंतर तिला रस्त्यावर पळवू लागतो. हा खेळ बराच वेळ चालतो, पण पुढे स्पीड ब्रेकर येताच प्रियकराने प्रेयसीला कार्टसह सोडून दिलं, ज्यामुळे ती खूप जोरात आदळली आणि हवेत उडून खाली पडली. आयफोनसाठी काय पण! गटारात फोन पडताच तरुणाचं धक्कादायक वागणं, नक्की हा प्रकार काय? हा मजेशीरपद्धतीने केलेला प्रँक खूपच धोकादायक होता. ज्यामुळे ही तरुणी जखमी झाली आहे. प्रियकराच्या अशा कृत्यामुळे नेटकरी देखील हैराण झाले आहेत. लोक यावर जोरदार प्रतिक्रिया देखील देत आहेत. हा व्हिडीओ @couldgowrongvid नावाच्या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘शॉपिंग कार्ट.’ यासोबतच हसणारा इमोजीही पोस्ट करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या