नवी दिल्ली 03 फेब्रुवारी : एखादी व्यक्ती अडचणीत असली की साथ देण्यासाठी जवळचंच कोणीतरी येतं, असं म्हटलं जातं. अनेकदा आपण कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीतच या गोष्टी बघतो. सध्या याचाच उदाहरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. यात दिसतं की एक लहान मुलगा आपल्या लहान भावाला वाचवण्यासाठी कुत्र्यासोबतच पंगा घेऊ लागला (Boy Save his Small Brother from Dog Attack). हे दृश्य पाहून तुम्हीही नक्कीच विचारात पडाल. काहीच सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक चिमुकला आपल्या भावाला रस्त्यावरुन घेऊन जात आहे. लहान भावाने अंगावरती शॉलही घेतली आहे. इतक्यात रस्त्यावर असलेला एक पांढऱ्या रंगाचा कुत्रा त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यासाठी पुढे येतो.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबद्दल असा दावा केला जात आहे, की हे दोघंही भाऊ आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की दोन लहान मुलं रस्त्यावरुन पायी चालली आहेत. इतक्यात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी एक पांढऱ्या रंगाचा कुत्रा समोर आला.
लहान मुलाने आपल्या पायात मोठ्या साईजची चप्पल घातलेली आहे. कुत्रा हल्ला करण्यासाठी पुढे येताच हा मुलगा त्याला मारण्यासाठी इशारा करतो. यानंतर कुत्रा घाबरून मागे हटतो. यानंतर हा मुलगा आपल्या भावाला रस्त्यावर पुढे घेऊन जातो. या मुलाचं आपल्या लहान भावावर असलेलं प्रेम पाहून सोशल मीडिया यूजर्स त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
थंडीत आपल्या लहान भावाची काळजी घेणाऱ्या या मुलाचं चांगलंच कौतुक होत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, भाऊ असावा तर असा. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 4 लाख 50 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर 38 हजारहून अधिकांनी लाईक आणि 4 हजार 800 हून अधिकांनी रिट्विट केला आहे. यासोबतच हा मन जिंकणारा व्हिडिओ पाहून शेकडो लोकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.