JOIN US
मराठी बातम्या / Viral / मादक अदा, हटके स्टाईल; तरुणाचा हॉट डान्स पाहून नोरा फतेहीला विसराल, पाहा Video

मादक अदा, हटके स्टाईल; तरुणाचा हॉट डान्स पाहून नोरा फतेहीला विसराल, पाहा Video

लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अनेक हटके गोष्टी करतात. सोशल मीडियावर तर विविध व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भयानक, स्टंट, डान्स व्हिडीओ समोर येत असतात.

जाहिरात

डान्स व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12  जुलै : लोक प्रसिद्धी झोतात येण्यासाठी अनेक हटके गोष्टी करतात. सोशल मीडियावर तर विविध व्हिडीओ चर्चेत येत असतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, भयानक, स्टंट, डान्स व्हिडीओ समोर येत असतात. नुकताच समोर आलेला व्हिडीओ डान्सचा आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचेही होश उडतील. मुलीने मादक डान्स करत सर्वांनाच थक्क केलं आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. एका तरुणाचा मादक डान्स समोर आलाय. रवीना टंडनच्या ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्यावर त्यानं मुलीलाही लाजवेल असा फायर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलाने स्लीव्हलेस ब्लाउज आणि पिवळ्या रंगाची साडी घातली आहे आणि पावसाच्या पाण्यामध्ये नाचत आहे. त्याच्या मादक अदा, डान्सचा लय पाहून कोणीही थक्क होईल. सुरुवातीला तर कोणी मुलगीच नाचत असल्याचं वाटतं.

संबंधित बातम्या

डान्स व्हिडिओमधील या मुलाच्या हालचाली पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. मुलाच्या डान्स मूव्ह्स आणि ठुमके आणि जबरदस्त एक्सप्रेशनही लोकांना घायाळ करणारे आहेत. या डान्सचे कौतुक करत भरपूर कमेंट करत आहेत आणि ते पाहणाऱ्यांची संख्या हजारांच्या पुढे गेली आहे. @amit_the_shinning_star नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या