साडी घालून स्टंट
नवी दिल्ली, 15 जून : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. एवढंच नाही तर लोक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक स्टंट करायला कमी करत नाही. इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ धुमाकूळ घालत असतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक मुलगी चक्क डोळ्यांना पट्टी बांधून स्टंट करत आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एका मुलीचा स्टंट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये मुलीने चक्क साडी घालून, डोळ्यावर पट्टी बांधून स्टंट केला आहे. व्हिडीओच्या पुढे नेमकं काय झालं हे पाहणं जास्त आश्चर्यकारक आहे. मुलीचा स्टंट यशस्वी झाला की महागात पडला, व्हिडीओच्या शेवटी नेमकं काय झालं हे जास्त उत्सुकता वाढवणारं आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एका कडेला स्कूटी उभी केलेली आहे. ज्यावरुन मुलगी उडी मारताना दिसत आहे. मुलीने साडी नेसून हा पराक्रम करून दाखवला आहे. मुलीने आधी डोळ्यावर पट्टी बांधली दिसत आहे. मग ती स्कूटीच्या मागच्या सीटच्या टोकावर उभी राहिली आणि तिने हवेत उलटी उडी मारली. मुलगी पलटी मारून सरळ जमिनीवर उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तोल गेल्याने ती खाली पडते.
मुलीच्या या धोकादायक स्टंटचा व्हिडीओ इंटरनेटवर काही क्षणातच व्हायरल झाला. shalugymnast नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंट येताना दिसत आहे. दरम्यान, असे अनेक स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसतात. असे धोकादायक स्टंट अनेकदा लोकांना महागातही पडतात. ज्यामुळे त्यांना दुखापत होते. सध्याच्या व्हिडीओमध्येही मुलीचा तोल गेला मात्र तिला जास्त दुखापत झाली नाही. स्टंट करताना थोडीशीही चूक कोणालाही जीवावर बेतू शकते.