पक्ष्याचा जीव वाचवण्यासाठी व्यक्तीची धडपड.
मुंबई, 11 एप्रिल : सोशल मीडयावर प्राणी -पक्ष्यांचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका पक्ष्याचा जीव धोक्यात होता. त्याच्या घशात मासा अडकला होता, तो तडफडत होता. त्याला पाहताच एका व्यक्तीने त्याला वाचवण्यासाठी धडपड केली. या व्यक्तीने त्या पक्ष्याच्या चोचीत आपला हात टाकला. पण शेवटी जे घडलं ते धक्कादायक आहे. असे काही लोक आहेत, जे मुके जीव संकटात दिसताच त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. प्राणी-पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही. मुक्या जीवाला वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतात. या व्यक्तीने अशाच मुक्या जीवाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, ही व्यक्ती पाण्याच्या मधोमध बोटीत आहे. पाण्यात एक पक्षी तडफडताना दिसतो आहे. त्या पक्ष्याच्या चोचीत मासा दिसतो आहे. हा मासा त्या पक्ष्याच्या घशात अडकला आहे. पक्ष्याचा जीव धोक्यात आहे हे पाहताच ही व्यक्ती आपली बोट त्या पक्ष्याजवळ नेते. पक्ष्याच्या तोंडातून मासा काढण्याचा प्रयत्न करते. बिबट्या-मगरीची सुरू होती तुफान फायटिंग, मध्येच वाऱ्याच्या वेगाने धावत आला रेडा अन्…; थरारक VIDEO पण जितकं दिसत होतं, तितकं हे सहजसोपं नव्हतं. व्यक्ती त्या माशाला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण मासा काही सहजासहजी बाहेर येत नाही. त्यानतंर ती व्यक्ती त्या पक्ष्याची चोच पूर्ण उघडते आणि आपला हात त्या चोचीत टाकते. अगदी पक्ष्याच्या घशापर्यंत त्या व्यक्तीचा हात जातो. हातांनी माशाचं तोंड तो बाहेर आणतो. पण त्याला जे दिसतं ते धक्कादायक आहे. माशाच्या तोंडाला एक हुक आहे. या हुकासह मासा या पक्ष्याच्या घशात अडकला होता. आश्चर्य म्हणजे हा मासाही जिवंत आहे. कसंबसं करून त्या व्यक्तीने या माशाला पक्ष्याच्या तोंडातून पूर्णपणे बाहेर काढला आणि माशाच्या तोंडातील हुकही. एकाच वेळी त्याने दोघांचाही जीव वाचवला आहे. बाबो! साधासुधा नाही हा रेडा, याच्यासमोर लक्झरी गाड्याही फेल; खासियत अशी की तोंडात बोटं घालाल @TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच या व्यक्तीचं कौतुक केलं जातं आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या.