मुंबई, 18 मार्च : सिंह, वाघ, बिबट्या, कोल्हा हे प्राणी खतरनाक. एरवी अशा प्राण्यांना पाहूनच घाम फुटतो. पण जर त्यांच्यासमोर एखादी आई असेल आणि या भयंकर प्राण्यांपासून तिला आपल्या पिल्लांची, मुलांना वाचवायचं असेल तर मात्र या आईच्या ताकदीसमोर या प्राण्यांची ताकद फेल ठरते. आपली मुलं आणि पिल्लांसमोर असे प्राणी आले तर ती मध्ये ढाल बनून उभी राहते आणि वेळ पडली तर त्यांच्या जबड्यात हात घालून त्यांना परत आणते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bird fight with fox). आईचं प्रेम आणि ताकद हे फक्त माणसंच नव्हे तर प्राणी आणि पक्ष्यांमध्येही पाहायला मिळते. अशाच एका छोट्याशा पक्ष्याने कोल्ह्यासारख्या प्राण्यापासून आपल्या पिल्लांना वाचवलं आहे. गीझ पक्षी आणि कोल्ह्याच्या या व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लढाईचा शेवट धक्कादायक आहे. हे वाचा - एका हरणासाठी 6 सिंहांची आपसात झुंज! एकमेकांवर तुटून पडले अखेर…; VIDEO VIRAL व्हिडीओत पाहू शकता एका खड्ड्यात पाणी आहे आणि त्यात एका पक्ष्याचं कुटुंब आहे. हा पक्षी म्हणजे गीझ जो बदक आणि हंसासारखा दिसतो. पक्ष्याची जोडी आपल्या पिल्लांसोबत या पाण्यात आहे. त्याचवेळी पिल्लांना पाहून एक भलामोठा कोल्हा त्यांची शिकार करायला येतो. जेव्हा गीझ पक्ष्यांची जोडी आपल्या पिल्लांचं रक्षण करताना दिसते.
एक गीझ पक्षी पिल्लांच्या अगदी जवळ आहे. त्याने आपल्या पंखात पिल्लांना दडवून ठेवलं आहे. तर दुसरा गीझ पक्षी कोल्ह्यासमोर पंख पसरून उभा राहिला आहे. कोल्हा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तसा तो पक्षी आपल्या पंखांनी कोल्ह्याला मारतो. असं बराच वेळ चालतं. त्यानंतर आपल्याला काही शिकार करता येणार नाही हे कोल्ह्यालाही समजतं. त्यामुळे तो गुपचूप माघार घेतो आणि तिथून निघून जातो. हे वाचा - VIDEO-वडिलांची नजर हटताच चिमुकल्याला घेऊन उडाला पक्षी; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.