(प्रतीकात्मक फोटो)
मुंबई, 14 मार्च : बाळाची चाहूल लागताच ते कसं असेल? ते हेल्दी असेल ना?, त्याला काही समस्या तर नसेल ना? असे किती तरी प्रश्न प्रेग्नन्सीच्या कालावधीत येतात. फक्त बाळाची आई, वडीलच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बाळाबाबत चिंता असते. ते कसं असेल हे पाहण्यासाठी त्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. असंच एक बाळ चर्चेत आलं आहे कारण त्याला पाहून आईबाबाला धक्का बसला आहे तर नर्स-डॉक्टरही शॉक झाले आहेत. यूकेच्या वेरिंग्टनमधील रूबी इडेन आणि तिचा नवरा क्रिस या दाम्पत्याने जेव्हा आपल्या नवजात बाळाला पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हे बाळ साधंसुधं नाही तर चक्क एक टेडी आहे. त्यामुळे हे बाळ चर्चेत आलं आहे. 24 वर्षांच्या रूबीने ऑगस्ट 2022 साली रुग्णालयात तिने एका बाळाला जन्म दिला. जेव्हा बाळ पोटातून बाहेर आलं तेव्हा त्याला पाहताच डॉक्टर आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी हैराण झाले. जन्मानंतर टेडीचं वजन 5 किलो 500 ग्रॅम होतं. सामान्यपणे जन्मावेळी बाळाचं वजन 2.5 ते 3.5 किलो असतं. त्यामुळे या बाळाला बिग साइज बेबी म्हणण्यात आलं. त्याचं वजन पाहता त्याचं नावच टेडी ठेवण्यात आलं. OMG! 9 महिने नव्हे तब्बल 9 वर्षे ‘प्रेग्नंट’ होती महिला; पोटातील बाळाला पाहून डॉक्टरही हैराण मेट्रो यूकेच्या वृत्तानुसार रूबीने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या बाळाबाबत सांगितलं, ती म्हणाली टेडीचा जन्म डिलीव्हरीच डेटच्या 8 दिवसांनी झाला. तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की त्याचं वजन 3.5 किलोच्या आसपास असेल. पण जन्मानंतर तो साडेपाच किलोचा निघाला. जेव्हा मी पहिल्यांदा बाळाला पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. त्याचं डोकं टरबूजाइतकं मोठं होतं. एका मोठ्या मुलाप्रमाणे तो वाटत होता. त्याचा आकार सामान्यपेक्षा खूप मोठा होता. माझ्या नवऱ्याने त्याला पाहताच हा एक मोठा मुलगा आहे, असं म्हटलं. नर्स आणि डॉक्टरही हैराण होते की इतका मोठा मुलगा कसा जन्माला आला.
टेडी पॉलीहाइड्रमनिओस या मेडिकल कंडिशनसह जन्माला आहे. जेव्हा प्रेग्नन्सीच्या कालावधीत बाळाच्या चारही बाजूने अतिरिक्त एमनियोटिक द्रव असतं तेव्हा ही कंडिशन निर्माण होते, असंही ती म्हणाली. Shocking! एक वर्षाची चिमुकली ‘प्रेग्नंट’; पोटाऐवजी डोक्यात वाढत होतं मूल रूबी आणि तिच्या 27 वर्षीय पती क्रिसला टेडीसाठी मोठ्या वयाच्या मुलांचे कपडे खऱेदी करावे लागले. कारण नवजात बाळाचे कपडे त्याच्यासाठी खूप छोटे होते. आता टेडी 7 महिन्यांचा आहे आणि एकदम फिट आहे.