बेवफा पान वाला
अभिलाष मिश्रा, प्रतिनिधी इंदूर, 6 जून : आजपर्यंत तुम्ही बेवफा चायवाला आणि बेवफा समोसा वाले यांचे नाव ऐकले असेल. पण तुम्ही कधी बेवफा पान वाल्याचे नाव ऐकले आहे का? हा असाही प्रकार समोर आला आहे. हा बेवफा पानवाला इंदूरमधला आहे, जो प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांना केवळ 2 रुपयांमध्ये स्वादिष्ट पान विकतो. दुसरीकडे, पानप्रेमी जोडप्यांना एका पानासाठी 20 रुपये मोजावे लागतात. दुकानाचे नावही बेवफा पानवाला आहे. तर त्यामागे एक रंजक कथा आहे. या दुकानाचा संचालक रोहितने सांगितले की, माझा एक खास मित्र रमेश आहे, त्याची प्रेमात फसवणूक झाली आहे. ही काही रचलेली कथा नाही. त्यावेळी मी स्वतः ते प्रकरण हाताळले. यानंतर आम्ही दोघांनी भागीदारीत हे दुकान सुरू केले.
मी सुद्धा प्रेमाच्या प्रकरणात माझ्या मित्राची ती अवस्था पाहिली होती, म्हणून आम्ही आमच्या दुकानाचे नाव बेवफा पान वाला ठेवले. आता हे दुकान मी एकटाच चालवतो. प्रेम करायला आणि दोन रुपये किमतीचे पान खावू घालायला मोठं मन लागतं, असेही तो म्हणाला. प्रेमात फसवणूक झालेल्यांना दिलासा, तर कपल्सला दंड - दुकानाचा मालक रोहितने सांगितले की, मुलीच्या आणि त्या प्रत्येक बेवफा व्यक्तीच्या नावाने प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांना आम्ही दोन रुपयांमध्ये पान खाऊ घालतो. हळूहळू आता या नावाचाही प्रसार झाला. आज युनिक नावाचा ट्रेंडही सुरू आहे. आमच्या दुकानातील स्पेशल गोड पानाचा दर 20 रुपये असला तरी प्रेमात फसवणूक झालेल्या लोकांना 18 रुपयांची सूट दिली जाते. आमच्या दुकानात मोठ्या संख्येने लोक येतात आणि पान खातात. आमच्या दुकानाच्या नावासोबतच लोकांना आमच्या दुकानाचे पान नक्कीच आवडत आहे. पान सगळेच बनवतात, पण प्रत्येकाची चव वेगळी असते. तुमचीही प्रेमात फसवणूक झाली असेल, तर तुम्ही या दुकानाला भेट देऊन तुमची कहाणी बिनदिक्कतपणे सांगू शकता. यासोबतच तुम्ही 2 रुपयांमध्ये पानदेखील घेऊ शकता. तर प्रेमी जोडप्यांकडून 20 रुपये घेतले जातात, त्याला लोक दंडम्हणून देखील नाव देत आहे.