JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : देशाची लाज घालवणारं तरुणींचं कृत्य, हातात सिगरेट घेत उडवली राष्ट्रगीताची खिल्ली आणि...

Viral Video : देशाची लाज घालवणारं तरुणींचं कृत्य, हातात सिगरेट घेत उडवली राष्ट्रगीताची खिल्ली आणि...

हातात सिगरेट घेत राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या दोन तरुणींचा व्हिडीओ व्हायरल

जाहिरात

राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या दोन तरुणी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीची माहिती मिळते. शिवाय हे मनोरंजक जग देखील आहेत. येथे कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. कधी धक्कादायक तर कधी मनोरंजक गोष्टी येथे पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो आपल्या देशाचा अपमान करणारा आहे. हा व्हिडीओ दोन मुलींचा आहे, ज्यामध्ये या दोन मुली आपल्या राष्ट्रगीताचा अपमान करताना दिसत आहेत. या मुली विचित्र पद्धतीने राष्ट्रगीत गात आहेत आणि त्याची मस्करी उडवत आहेत. तसेच राष्ट्रगीत गाताना हातात सिगरेट धरुन बसल्या आहेत. त्यांचं हे वागणं भारतीयांच्या भावना दुखवणारं आहे.

हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली राष्ट्रगीताचा अनादर करताना दिसत आहेत. दोन्ही बंगाली मुली एकाच वेळी राष्ट्रगीत गात आहेत आणि सिगारेट हातात घेऊन आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली, यानंतर सायबर सेलने दोन्ही मुलींविरुद्ध बराकपूरमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भाजप नेत्याने या दोन मुलींवर एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये ते धूम्रपान करताना आणि चुकीचे राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. भाजप नेते अनुपम भट्टाचार्जी यांनीही हा व्हिडिओ शेअर करत दोन्ही मुलींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या मृत्यूची साक्ष देण्यासाठी ‘मृत महिला’ पोलिस स्टोशनमध्ये, नक्की के प्रकरण तरी काय? जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा कोलकाता उच्च न्यायालयाच्या वकिलासह अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या दोघांविरुद्ध कारवाईची मागणी करत पोलिसात तक्रार दाखल केली. बराकपूरचे पोलिस आयुक्त आलोक राजोरिया यांनी सांगितले की, तपास सुरू झाला आहे. फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टबद्दल आवश्यक तपशील गोळा केले जात आहेत. तपासानंतर लवकरच पुढील कारवाई केली जाईल. मुली अल्पवयीन आहेत की नाही हे कळू शकलेले नाही. काही रिपोर्ट्सनुसार, त्या 11वीत असल्याचे सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या

माहितीनुसार, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि लोकांनी कारवाईची मागणी केल्यानंतर मुलींनी फेसबुकवरून व्हिडिओ डिलीट केला. राष्ट्रगीताच्या अपमानावर कायदा काय म्हणतो? कोणत्याही राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करणं गुन्हा आहे. प्रतिकांचा अपमान करणे हा भारतीय राज्यघटनेचा अवमान मानला जातो. उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. राष्ट्रीय सन्मान कायदा, 1971 च्या कलम 3 मध्ये प्रदान केल्याप्रमाणे. जो कोणी मुद्दाम राष्ट्रगीताचा अपमान करेल किंवा राष्ट्रगीत सुरु असताना कोणत्याही प्रकारचा गडबड किंवा अनादर घडवून आणेल त्याला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होईल. ही शिक्षा वाढू देखील शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या