JOIN US
मराठी बातम्या / Viral / ऑपरेशन होतंय म्हणून घाबरू नका; सर्जरीआधी जरूर विचारा हे 3 प्रश्न, आहेत तुमच्या फायद्याचे

ऑपरेशन होतंय म्हणून घाबरू नका; सर्जरीआधी जरूर विचारा हे 3 प्रश्न, आहेत तुमच्या फायद्याचे

एका कायदेशीर सल्लागाराने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांना तीन प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला आहे.

जाहिरात

सर्जरीआधी विचारा 3 प्रश्न

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 जुलै : ऑपरेशन करायचं म्हटलं की काळजात धस्सं होतं. सर्जरी ची भीती तर वाटतेच, शिवाय सर्वात मोठी चिंता असते ती पैशांची. डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागणार आहे, असं म्हटलं की सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो तो किती खर्च येईल. पण खर्चाशिवाय ऑपरेशनआधी आणखी तीन प्रश्न विचारायला हवेत. हा खरंतर तुमचा अधिकार आहे आणि यामुळे तुमचाच फायदा आहे. एका कायदेशीर सल्लागाराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याने शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांना तीन प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला आहे. ते प्रश्न कोणते आणि का विचारावेत, तेसुद्धा त्यांनी व्हिडीओत सांगितलं आहे. टॉमी असं या सल्लागाराचं नाव आहे. त्यांनी आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. OMG! डॉक्टरांनी केला महादेवासारखा ‘चमत्कार’; मुलाचं धडावेगळं झालेलं डोकं पुन्हा जोडलं टॉमी म्हणाले, प्रत्येक रुग्णाला शस्त्रक्रियेतील रेसिडंट डॉक्टरांची भूमिका जाणून घेण्याचा अधिकार आहे. शस्त्रक्रियेत निवासी डॉक्टर काय भूमिका बजावतील? हे विचारा. कारण निवासी डॉक्टर-इन-ट्रेनिंग आहेत. ते तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित आहे. त्यांनी आवश्यक परीक्षादेखील उत्तीर्ण केल्या आहेत, परंतु तरीही ते प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्याकडे 0 दिवस, एक दिवस किंवा 2 वर्षांपर्यंतचा अनुभव असू शकतो, परंतु तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही दुसरा प्रश्न म्हणजे तुमचं ऑपरेशन कोण करेल हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. शस्त्रक्रिया कशी होईल? सर्जनची भूमिका किती प्रमाणात असेल? हे विचारा. तिसरा प्रश्न म्हणजे सर्जनला त्याने या प्रकारची शस्त्रक्रिया यापूर्वी केली आहे का. जर होय तर किती शस्त्रक्रिया झाल्या त्याची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे. विशेषत: तुमच्यावर गंभीर शस्त्रक्रिया होत असल्यास, हे निश्चितपणे लक्षात ठेवा. स्पष्टपणे विचारणं हा तुमचा अधिकार आहे. यामुळे तुम्हाला फरक पडतो. हा काय प्रकार? माणसाच्या पायाला हात; VIRAL PHOTO पाहून सर्वांना धक्का हा व्हिडिओ शेअर करताच व्हायरल झाला. लोकांनी टॉमीचे खूप आभार मानले. एका यूझरने  पुढच्या वर्षी माझ्या मुलाची मोठी आणि अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया होईल, तेव्हा मी हे प्रश्न नक्की विचारेन, असं म्हटलं. तर  एकाने कमेंट केली, माझ्या वडिलांना शस्त्रक्रिया करावी लागली. डॉक्टर येताच त्यांनी हे सगळे प्रश्न विचारले. यावरून आम्हाला कळलं आणि आम्ही सर्जन बदलल्याचं म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या