मांजर
नवी दिल्ली, 17 एप्रिल : लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये प्रेम भांडण अशा सर्वच गोष्टी पहायला मिळतात. मात्र कधी कधी एक छोटसं भांडणंही दुराव्याचं कारण ठरतं. आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या शुल्लक कारणामुळे पती पत्नीचं टोकाचं भांडण झालं आहे. सध्या असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये पत्नीने पतीच्या एक गोष्टीच्या रागात मोठं पाऊल उचललं. हे प्रकरण नेमकं काय याविषयी जाणून घेऊया. कधी विचार केलाय का एका मांजरीवरुन पती पत्नीचा घटस्फोट होऊ शकतो. हे ऐकायलाही कदाचित विचित्र वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. एका पत्नीने चक्क मांजरीमुळे आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
पत्नी एक दिवस बाहेर गेली असता पतीने मांजरीला घराबाहेर फेकले. ती महिला त्या मांजराला आपले वडिल मानत होती. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने बेंजी नावाची मांजर आणली होती. ती मांजरावर खूप प्रेम करायची. पतीला या गोष्टीचा राग होता आणि त्याने मांजरीला घराबाहेर फेकलं. मात्र पतीच्या या कृत्यामुळे महिला त्याला घटस्फोट देणार आहे. हेही वाचा - सायकलवर जीवघेणा खेळ, शेकडो फूट उंचावर स्टंट करत होता तरुण; Video पाहून येईल अंगावर काटा घटस्फोट घेणार असलेल्या या महिलेने तिचा हा अनुभव Reddit वर शेअर केला. तिने लिहिलं की, पतीला मांजराचा सहवास आवडत नव्हता. महिला सुट्टीला बाहेर गेल्यावर त्याने त्याच्या सहकाऱ्याला मांजर दिली. पत्नीने सहकाऱ्याला मागितल्यावर त्याने मांजर त्याच्याकडे नसल्याचं सांगितलं. पत्नीने पतीला कठोरपणे विचारल्यावर त्याने एका शेल्टरला असल्याचं सांगितलं. महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि ती पतीपासून घटस्फोट मागणार आहे. दरम्यान, प्रेम, लग्न, यासंबंधीत अशा विचित्र घटना समोर येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढलं आहे. सोशल मीडियावर अशा घटना झपाट्यानं व्हायरल होतात.