नवी दिल्ली, 17 एप्रिल : सोशल मीडियावर निरनिराळे व्हिडीओ व्हायरल येत असतात. यामध्ये मजेशीर, विचित्र, धक्कादायक, स्टंट व्हिडीओ पहायला मिळतात. असेही अनेक व्हिडीओ समोर येतात ज्यांना पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हालाही धडकी भरेल. सध्या समोर आलेला व्हिडीओ स्टंटचा असून या धोकादायक प्रकाराने तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जमीनीपासून शेकडो फूट उंचावर एक तरुण सायकल घेऊन स्टंट करत आहे. एवढ्या उंचावरही तो सायकल एखाद्या खेळण्यासारखी उडवत असून निर्भीडपणे स्टंट करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
@TheFigen_ नावाच्या ट्टिटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय व्हिडीओवर कमेंट लाईक्सचा भडिमार होताना दिसतोय. अनेकांनी हा स्टंट धोकादायक असल्याचं सांगितलं यामुळे एखाद्याचा जीवदेखील जाऊ शकतो. तर अनेकजण अशा स्टंट करण्यासाठी आलेल्या एनर्जीवर मजा घेत आहेत.
OMG whoa!! Would you dare??pic.twitter.com/2fQFj1ozJJ
— Figen (@TheFigen_) April 14, 2023
दरम्यान, सोशल मीडियावर अशा धोकादायक स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे भीतीदायक, धोकादायक स्टंट लोक करताना दिसतात. तरुणाचा याकडे जास्त कल असल्याचं पहायला मिळतं.