JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाघासारख्या प्राण्यांनाही न घाबरणाऱ्या अस्वलाची छोट्याशा पपीला पाहूनच तंतरली; VIDEO चा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

वाघासारख्या प्राण्यांनाही न घाबरणाऱ्या अस्वलाची छोट्याशा पपीला पाहूनच तंतरली; VIDEO चा शेवट पाहून विश्वास बसणार नाही

छोट्याशा पपीला पाहताच अस्वलाला घाम फुटला, तो थरथरू लागला. पुढे जे घडलं ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च :  अवाढव्य आणि खतरनाक अस्वलासमोर कुत्र्याचं एखादं छोटंसं पिल्लू आलं, तर काय होईल किंवा यांच्या लढाईत कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिक प्रत्येकाचं उत्तर असेल ते अस्वल. पण अगदी याच्या विरुद्ध असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चक्क एका कुत्र्याच्या पिल्लाला भलंमोठं अस्वल घाबरलं आहे. अस्वल जे वाघ, बिबट्या अशा हिंस्र प्राण्यांनाही घाबरत नाही. असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये असे प्राणी हल्ला करायला येताच अस्वलाने त्यांचा प्रतिकार करून त्यांनाच धूम ठोकायला भाग पाडलं. अशा प्राण्यांनाही न घाबरणारं अस्वल एका साध्या छोट्याशा पपीला घाबरलं आहे. कुत्र्याच्या छोट्याशा पिल्लाला पाहताच त्याला घाम फुटला, तो थरथरू लागला. पुढे जे घडलं ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसत नाही. हे वाचा -  Shocking! हत्तीने म्हशीला सोंडेत धरून जमिनीवर आपटलं; VIDEO चा शेवट धक्कादायक कोणतीही लढाई लढण्यासाठी, लढण्यासाठी ताकद नाही हिंमतीची गरज आहे. हेच या अस्वल आणि श्वानाच्या व्हिडीओतून दिसून येतं आहे. कुत्र्याच्या एक छोटंसं पिल्लू भल्यामोठ्या अस्वलाला सामोरं गेला आहे. छोट्याशा पपीने अस्वलाला चांगलाच धडा शिकवला आहे. त्याला सरो की पळो करून सोडलं आहे.

संबंधित बातम्या

द सनच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका झाडाखाली एक अस्वल आरामात शांत बसला आहे. त्यावेळी त्याची नजर एका कुत्र्याच्या पिल्लावर पडते. त्याला पाहताच तो त्याच्यावर हल्ला करायला जातो. पण होतं उलटं. कुत्र्याचं पिल्लू अस्वलाला पाहतं आणि इतका मोठा प्राणी पाहिल्यानंतर पळून जाण्याऐवजी तो उलट त्याच्याजवळ जातो आणि जोरजोरात भुंकू लागतो. त्यावेळी अस्वलाची झालेली अवस्था पाहून शॉक बसतो आणि हसूही येतं. हे वाचा -  शोधा म्हणजे नक्की सापडेल! सांगा पाहू या PHOTO मध्ये लपला आहे कोणता प्राणी? अस्वल कुत्र्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करतो. आधी तो झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो. पण झाडावर चढणं त्याला काही शक्य होत नाही. त्यावेळी तिथून पळण्याचा मार्ग तो शोधतो. पिल्लू जसजसं जवळ येतं तसतसं ते थरथरू लागतं. अखेर कसंबसं करून संधी मिळताच तो तिथून पळतो आणि त्यानंतर पळतच सुटतो. कुत्र्याचंही पिल्लूही त्याचा पाठलाग करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या