JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ तेरी! बॅट्समनने मारला असा शॉट, थेट टीव्हीबाहेरच आला बॉल; आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

ओ तेरी! बॅट्समनने मारला असा शॉट, थेट टीव्हीबाहेरच आला बॉल; आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

क्रिकेटमध्ये असा शॉट तुम्ही कधीच पाहिला नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

 मुंबई, 13 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानात बॅट्समनच्या (Batsman) शॉटकडे सर्वांचं लक्ष असतं. बॅट्समन (Batsman shot) कधी फोर किंवा सिक्स मारणार याची उत्सुकता असते. अनेकदा बॅट्समन असा शॉट मारतात की तिथं बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत बॉल पोहोचतो. पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात बॅट्समनने असा मारला की बॉल थेट टीव्ही पाहत असलेल्या प्रेक्षकांकडेच आला. म्हणजे बॉल चक्क टीव्हीबाहेर आला (Batsman hit ball came out of the tv). आनंद महिंद्रा (Anand mahindra) यांनी क्रिकेटचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सुरुवातीला थोडा शॉकिंग आहे, पण मजेशीर आहे.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता काही लहान मुलं टीव्हीवर मॅच पाहत आहेत. इतक्यात एक खेळाडू बॉलला हिट करतो आणि बॉल टीव्हीच्या पलीकडून टीव्हीच्या अलीकडे येतो. हे वाचा -  तहानलेल्या कावळ्यानंतर भुकेल्या कावळ्याचा VIDEO; खाण्यासाठी अशी लढवली युक्ती त्यानंतर टीव्हीतून एक मुलगा स्क्रिनजवळ पळत येताना दिसतो. तो स्क्रीनमधून हात टाकतो आणि बॉल मागतो. तेव्हा समजतं की हा व्हिडीओ म्हणजे टीव्हीत सुरू असलेल्या मॅचचा व्हिडीओ नाही तर तिथं सुरू असलेल्या खऱ्या मॅचचा व्हिडीओ आहे. मुलांची क्रिएटीव्ही नेटिझन्सना खूपच आवडली आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. या मुलांच्या हुशारीचं कौतुक केलं जातं आहे. हे वाचा -  …अन् हवेत उडू लागला कुत्रा; Flying dog चा VIDEO पाहून थक्क व्हाल आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना पोस्टमध्ये म्हटलं आहे, हा एक जुना व्हिडीओ आहे. पण आता कोरोना महासाथीत आपल्याला प्रत्येक काम करताना समोर एक स्क्रीन लावण्याची गरज पडत आहे, हेच हा व्हिडीओ आठवण करून देत आहे. मला सर्वकाही प्रत्यक्षात अनुभवयाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या