60 सेकंदात 2 दरोडेखोरांनी लुटली बँक.
अजमेर, 17 नोव्हेंबर : बँक लूट म्हटली की बऱ्याच लोकांना आठवेल ती मनी हाइस्ट वेब सीरिज. बऱ्याच फिल्ममध्येही बँक दरोड्याचे सीन दाखवले जातात. पण या रिल लाइफपेक्षाही खतरनाक असा रिअल लाइफमधील बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. फक्त 50 सेकंदात दोन दरोडेखोरांनी बँक लुटली आहे. एसबीआय या सरकारी बँकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. दरोड्याचा लाइव्ह थरारक व्हिडीओही व्हायरल होतो आहे. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील ही घटना आहे. जाडन गावातील एसबीआय बँकेत दरोडा पडला. दोन सशस्त्र दरोडेखोर बँकेत घुसले. बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी बँक लुटली आहे. फक्त 60 सेकंदात ते बँकेतील पैसे आपल्या बॅगेत भरून फरार झाले. सीसीटीव्ही फुटेजनुसार 17 नोव्हेंबरचीच ही घटना आहे. हे वाचा - रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचली व्यक्ती; पण चपलेसाठी पुन्हा मागे जाताच…; LIVE VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती बँकेत हेल्मेट घातलेली दिसत आहे. तर बँक कर्मचारी आपल्या डेस्कवर बसले आहेत. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. तो हवेत बंदुकीच्या गोळ्याही झाडतो. कर्मचाऱ्यांना धमकावतो आहे, घाबरवतो आहे. काही वेळाने आणखी एक हेल्मेट घातलेली व्यक्ती येते. जिच्या हातात बॅग आहे. ती व्यक्तीसुद्धा या कर्मचाऱ्यांना धमकी देते. त्यानंतर दोघंही तिथून निघून जातात.
अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. फक्त 60 सेकंदात हे सर्व घडलं आहे. हे वाचा - Video : कार चालकाचा स्टंट नागरीकांना पडला महागात, वाऱ्याच्या वेगानं कार आली आणि… माहितीनुसार ज्यावेळी दरोडा पडला तेव्हा बँकेत फक्त 5 कर्मचारी होते. दरोडेखोरांनी जवळपास 3 लाख रुपयांची लूट केली आहे. दरोडेखोर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसंना याची माहिती दिली. आता या दरोडेखोरांचा तपास सुरू झाला आहे.