JOIN US
मराठी बातम्या / Viral / जब तक है जान! पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO

जब तक है जान! पुराच्या पाण्यात बुडाली निम्मी गाडी तरी...; पाहा मजेशीर VIDEO

पुराच्या पाण्यातील बँड असलेल्या गाडीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑगस्ट : पुराच्या (Flood) पाण्यात (Flood water) अगदी महागड्या आलिशान गाड्यांचीही (Vehicle in flood water) काय अवस्था होते, हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. पुराच्या बऱ्याच व्हिडीओत आपण ते पाहिलं आहे. पण सध्या पुराच्या पाण्यातील अशा एका गाडीचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून आश्चर्यही वाटेल हसूही येईल. स्पीकर, भोंगा आणि घोड्याची प्रतिमा लावलेली गाडी तर तुम्हाला माहितीच असेल. हो तीच गाडी जी बहुधा लग्नात दिसून येते. ज्यावर लग्नाचा बँडबाजा ( Wedding Band) वाजवला जातो. अशाच गाडीचा हा व्हिडीओ (Band vehicle in flood water) आहे. जिथं मोठमोठ्या गाड्या पुराच्या पाण्यात राहत नाही. तिथं या गाडीचं काय होईल नाही का? पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हायल.

संबंधित बातम्या

व्हिडीओ पाहू शकता पुरामुळे सगळीकडे पाणीच पाणी आहे. या पुराच्या पाण्यात एका बँडची गाडी वाहताना दिसते आहे. हे वाचा -  Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल या गाडीची चाकं पाण्यात बुडाली आहेत. म्हणजे जवळपास निम्मी गाडी पाण्यात आहे. पण तरी या गाडीवर गाणं वाजतं आहे. गाडीवरील स्पीकरमधून गाण्याचा आवाज येतो आहे. जणू काही ही गाडी जब तक है जान… असा निर्धार करून पुराच्या पाण्यातही गाणं वाजवते आहे, असंच वाटतं. या गाडीत कुणीच माणूस नाही. पण गाडीने मात्र आपलं काम चोखपणे पार पाडलं आहे. हे वाचा -  VIDEO - मांस खाणारे सिंह चक्क खाऊ लागले फळ; रसरशीत, लालबुंद कलिंगडावर मारला ताव giedde इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. गणपत बजा रे बंद क्यों किया, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. शिवाय व्हिडीओवर पेमेंट बाकी है डिजेवाले का असंही लिहिण्यात आलं आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कुठला आहे माहिती नाही. पण व्हिडीओ पाहून त्यावर मजेशीर कमेंट येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या