प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
लंडन, 14 फेब्रुवारी : डोक्यावर केस कमी असतील, टक्कल पडलेलं असेल तर कुणालाच आवडत नाही. अनेकांना त्याची लाज वाटते. काही जण तर अशा व्यक्तींना चिडवतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या टक्कलमुळे चिडवलं जातं, ज्याची लाज वाटते, तेच टक्कल एका व्यक्तीसाठी लकी ठरलं. कारण या टक्कलमुळे त्याची नोकरी गेली पण त्यानंतर तो लखपतीही झाला. आता टक्कलमुळे व्यक्ती कसा काय लखपती झाला, पाहुयात. यूकेतील हे प्रकरण आहे. 61 वर्षांची ही व्यक्ती जिचं नाव मार्क जोन्स आहे. मार्क लीड्समधील टँगो नेटवर्कमध्ये काम करत होता. तो कंपनीतील सेल्स डायरेक्टर होता. त्याचा वर्षाचा पगार हज़ार पाउंड म्हणजे जवळपास 60 लाख रुपये होता. पण त्याचा बॉस फिलिप हेस्केथने त्याला अचानक नोकरीवरून काढून टाकलं. सामान्यपणे नोकरीवर ठेवताना कर्मचाऱ्याचं शिक्षण, कौशल्य, अनुभव पाहिला जातो. नोकरीवरून काढण्यासाठीही एक ठोस कारण लागतं. पण या फिलिपने मार्कला नोकरीवरून काढण्याचं कारण मात्र धक्कादायक आहे. ते म्हणजे त्याच्या डोक्यावर केस नसणं. हे वाचा - एनर्जी देणाऱ्या या गोष्टी पुरुषांसाठी ठरू शकतात टक्कल पडण्याचे कारण! वेळीच व्हा सावध आश्चर्य म्हणजे कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढणाऱ्या बॉसलाही टक्कलच होतं. त्याला आपल्यासारखे आणखी लोक नको होते. फिलिप म्हणाला, टक्कल असलेले 50 वर्षांचे पुरुष त्याला आपल्या टिममध्ये नको होते. आपल्या इथं काम करण्यासाठी त्याला एनर्जेटिक आणि तरुण लोक हवेत होते.
मार्क म्हणाला, कंपनीे मुद्दामहून असं केलं. कारण आणखी दोन वर्षे तो तिथं राहिला असता तर त्याला कर्मचाऱ्यांचे सर्व अधिकार मिळाले असते. टकला म्हून त्याला परफॉर्मेन्स इम्प्रुव्हमेंट प्लॅनमध्ये टाकण्यात आलं, जेणेकरून त्याच्यापासून सुटका मिळेल. पण तरी नको त्या कारणावरून कंपनीने नोकरीवरून हटवल्यानंतर मार्क शांत बसला नाही. तो इतका संतप्त झाला की त्याने कोर्टात धाव घेतली. बॉसला कोर्टात खेचलं. त्याच्याविरोधात केस ठोकली आणि भऱपाईची मागणी केली. हे वाचा - बापरे बाप! हे असं बाळ; प्रेग्नंट महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरांनाही बसला धक्का
द इंडिपेंडेंटच्या रिपोर्टनुसार फक्त टक्कल असल्याने कुणालाही नोकरीवरून काढू शकत नाही, असं म्हणत कोर्टाने त्याला 70.6 लाख रुपयांची भरपाई मिळून दिली.