JOIN US
मराठी बातम्या / Viral / संताप येईल, किळस वाटेल! क्रिस्पी टोस्ट आवडीने खात असाल तर हा VIDEO जरूर पाहा

संताप येईल, किळस वाटेल! क्रिस्पी टोस्ट आवडीने खात असाल तर हा VIDEO जरूर पाहा

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही टोस्ट खाणंही सोडून द्याल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर :  गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत टोस्ट (Toast) खायला अनेकांना आवडतं. पण हे टोस्ट कसे बनवले जातात हे तुम्ही पाहिलं आहे का? एका बेकरीतील धक्कादायक (Shocking video) व्हिडीओ (Toast video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून तुम्हाला किळस वाटेल, संतापही येईल. कदाचित तुम्ही टोस्ट खाणंही सोडाल. अनेकदा आपण चवीने जे पदार्थ खातो ते इतक्या अस्वच्छ ठिकाणी आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीने बनवले जातात याची कल्पनाही आपण करू शकत नाही. अशाच एका बेकरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

संबंधित बातम्या

टोस्ट पॅकिंग करताना कामगार असं काही करत आहे, जे पाहून अक्षरश: उलटी येईल. हे वाचा -  पुन्हा डोकं फिरवायला आली ढिंच्याक पूजा; तिच्या नव्या गाण्याचा VIDEO पाहिलात का? व्हिडीओत पाहू शकता ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावर पाय ठेवून बसले आहेत. बरं त्यांचा ट्रेवर पाय चुकीने पडला असं नाही तर ते मुद्दामहून असं करत आहेत. एका कामगाराने तर हद्दच केली आहे. तो ट्रेमधील टोस्टवर पुन्हा पुन्हा पाय मारतो. त्यानंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकतो, नंतर चाटतो आणि मग पिशवीत भरतो. कामगाराचा हा प्रताप पाहून अक्षरशः उलटी येते. तळपायातील आगही मस्तकात जाते. एकप्रकारे लोकांच्या जीवाशीच हे लोक खेळत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण कामगार जे काही करत आहे, त्यानंतर आता टोस्टही खायचा की नाही, असाच प्रश्न पडतो आहे. हे वाचा -  पॅकिंग खोलत गेला खोलत गेला आणि हातात आलं…; सरप्राईझ गिफ्ट पाहून झाला Shocked याआधी नवी मुंबईतही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. हॉटेलमधील वापरण्यात आलेल्या तेलात फरसाण तयार केलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. या जळालेल्या तेलातच फरसाण, चकली, वेफर्स, शेव, चिवडा, गाठी, फाफडा असे अनेक प्रकार तयार केले जातात. त्या खाद्य प्रदार्थांचा सप्लाय किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानदारांना केली जाते. नवी मुंबईतील ऐरोलीजवळील गोठीवली गावात हा प्रकार सुरू असताना एका तरुणाच्या लक्षात आलं. हा सर्व प्रकार एका तरुणानं कॅमेऱ्यात कैद केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या