मन जिंकणारा VIDEO
नवी दिल्ली 15 मे : या पृथ्वीतलावरील सर्व सजीवांमध्ये क्रौर्याबरोबरच ‘माणुसकी’ आहे आणि ती असणं आवश्यकही आहे. तसं, सामान्यतः असं मानलं जातं, की माणुसकी फक्त माणसांमध्ये आहे. कोणी संकटात दिसलं तर ते मदत करतात, कोणी भुकेलेलं असेल तर त्याला अन्न देतात, पाणी देतात. ही खरी माणुसकी आहे, पण प्राण्यांमध्ये अशा गोष्टी दिसत नाहीत असं अजिबातही नाही. काही प्राणी असेही असतात की, इतरांना संकटात पाहताच ते मदतीसाठी पुढे येतात, तर काही प्राणी इतर प्राण्यांशी इतक्या प्रेमाने वागतात की मन प्रसन्न होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटा गोरिला हरणासोबत अतिशय प्रेमाने वागताना दिसत आहे. तो अशा प्रकारे त्याची काळजी घेतो की हे पाहून कोणाचंही मन प्रसन्न होईल. अरेच्चा! दारू न दिल्याने भडकली बकरी, व्यक्तीवर केला जबर हल्ला, VIDEO पाहून व्हाल शॉक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान हरिण एका टेकडीच्या पायथ्याशी शांतपणे उभा आहे, तेव्हाच एक छोटा गोरिला तिथे पोहोचतो. सुरुवातीला असं वाटतं, की गोरिला हरणावर हल्ला करेल, परंतु तो येताच हरणाच्या डोक्याला आणि कानाला स्पर्श करू लागतो आणि नंतर त्याचे चुंबन घेतो. मग तो हरणाकडे काही सेकंद पाहतो आणि पुढे जातो. हे दृश्य खूप सुंदर आहे. सहसा अशी दृश्ये जंगलात दिसत नाहीत आणि गोरिला अतिशय धोकादायकही असतात, पण व्हिडिओमध्ये जे दिसलं ते आश्चर्यकारक आहे.
हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @AnimalBeingBro5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1.8 दशलक्ष म्हणजेच 18 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 41 हजारांहून अधिक लोकांनी लाईकही केला आहे आणि लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की ‘गोरिल्ला हा तसा दयाळू आणि बुद्धिमान प्राणी आहे’. तर काहीजण गमतीने म्हणत आहेत की ‘हा बेबी गोरिला खूप गोंडस आहे, मला तो हवा आहे’. त्याचप्रमाणे, इतर काही वापरकर्त्यांनी कमेंट करताना गोरिला आणि हरणाच्या या प्रेमाचं कौतुक केलं आहे.