JOIN US
मराठी बातम्या / Viral / हत्तीचं पिल्लू खड्ड्यात अडकलं, लोकांनी असा वाचवला जीव, Video व्हायरल

हत्तीचं पिल्लू खड्ड्यात अडकलं, लोकांनी असा वाचवला जीव, Video व्हायरल

हत्ती हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहे आणि वेळोवेळी ते पहायलाही मिळतं. आत्तापर्यंत हत्तीचे अनेक व्हिडीओ समोर आलेत ज्यामध्ये हत्तीने लोकांचा आणि प्राण्यांचाही जीव वाचवला.

जाहिरात

व्हायरल बातम्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 16 एप्रिल : हत्ती हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहे आणि वेळोवेळी ते पहायलाही मिळतं. आत्तापर्यंत हत्तीचे अनेक व्हिडीओ समोर आलेत ज्यामध्ये हत्तीने लोकांचा आणि प्राण्यांचाही जीव वाचवला. त्यामुळे हत्तीच्या अशा कृतीने नेहमीच लोकांची मनं जिंकली आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या लहान मुलाला अडचणीत पाहून लोकांची मदत मागण्यासाठी बाहेर पडला आहे. लोकांनीही हत्तीच्या बाळाला अडचणींतून बाहरे काढण्यास मदत केली असून याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर उभा असलेला हत्तीण कशी दुचाकीस्वाराची मदत मागत आहे. आपल्या सोंडेने लोकांनी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्या व्यक्तीला वाटते की हत्तीण त्याच्यावर हल्ला करणार आहे, म्हणून तो तेथून वेगाने निघून गेला. मात्र, यानंतर काही वेळातच हत्तीण जंगलात गेल्यावर त्याच्या मुलाला मदत करण्यासाठी काही लोक तिथे येतात, मात्र आधी ते हत्तीणीला तेथून हाकलून देतात, जेणेकरून कोणतीही हानी होऊ नये. यानंतर, ते खड्ड्यात अडकलेल्या हत्तीला वर आणण्याचा रस्ता बनवतात, त्यावर चढून तो देखील आरामात वर येतो आणि मग त्याच्या आईकडे धावतो. हृदयाला स्पर्श करणारा हा व्हिडीओ सर्वांची मनं जिंकत आहेत.

संबंधित बातम्या

@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा 52 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत असून लोक पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन झाल्याचं म्हणत आहे. हेही वाचा -  Viral Video : महिलेने बनवला 500 रुपयांच्या नोटेने भरलेला पराठा, शेवट पाहून तुम्हीही व्हाल Shock दरम्यान, सोशल मीडियावर कायमच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये खूप कमी व्हिडीओ लोकांचे मन जिंकतात. असे माणुसकीचं दर्शन घडवणारे व्हिडीओ नेहमी लोकांच्या पसंतीस उतरतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या