प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
कराची, 28 एप्रिल : कुणाला चार हात, चार पाय, कुणी एकमेकांना चिकटलेलं, कुणाला शेपटी आली अशी विचित्र बाळांची काही प्रकरणं आहेत. असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. हे बाळ 2 लिंगांसह जन्माला आलं आहे. पण त्याचा महत्त्वाचा असा एक बॉडी पार्ट गायब झाला आहे. अशा बाळाला पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. मानवी शरीरात प्रत्येक अवयवाचं काही ना काही महत्त्वं आहे. प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं आहे. त्यापैकी एक अवयव नसेल तर शरीराची प्रक्रिया बिघडू शकते. पाकिस्ताना एका बाळाचा अशाच महत्त्वपूर्ण अवयवाशिवाय जन्म झाला आहे. त्या अवयवाच्या बदल्यात त्याला दुसरा अवयव अतिरिक्त आहे.
इस्लामाबादमध्ये या बाळाचा जन्म झाला आहे. हा मुलगा असून त्याला दोन लिंग आहे. म्हणजे त्याला दोन पेनिस आहेत. त्यांचा आकार लहानमोठा आहे. एक पेनिस दुसऱ्या पेनिसपेक्षा एक सेमी लांब आहे. मुलाचे एक लिंग 1.5 सेमी तर दुसरे 2.5 सेमीचे होते. स्कॅनमध्ये असं दिसून आलं की त्याच्या शरीरात फक्त एक मूत्राशय आहे, जो दोन मूत्रमार्गांना जोडलेला होता. यामुळे, त्याला दोन्ही लिंगांमधून लघवी करता येत होती. Yuck! 2 वर्षांच्या चिमुकल्याला असं काही खायला देते आई की वाचूनच उलटी येईल; कारणही अजब पण त्याला गुद्द्वार नाही. त्यामुळे त्याला शौच करता येऊ शकत नाही. हे पाहून डॉक्टरही शॉक झाले. बाळाच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबात कुणालाही अशी समस्या नव्हती. वैद्यकीय भाषेत या स्थितीला डिफेलिया म्हणतात. असं प्रकरण 60 लाखांत एक असतं. आतापर्यंत अशा फक्त 100 प्रकरणांची नोंद आहे. सर्वात पहिलं प्रकरण 1609 साली नोंदवण्यात आलं होतं. पण ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण होते, याची माहिती डॉक्टरांनीही नाही. 36 आठवड्यांनंतर मुलाचा जन्म झाला आणि त्याच्यावर पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी कोलोनोस्कोपीद्वारे त्याच्या शरीरात एक छिद्र केलं आहे, ज्याच्या मदतीने त्याच्या शरीरातील मल बाहेर काढता येईल. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. बापरे! बाळाला दररोज बर्फ भरवत राहिले पालक, शेवटी…; नातवाला पाहून आजीलाही मोठा धक्का डेली मेल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्ट्समध्ये हे प्रकरण प्रकाशित करण्यात आलं आहे.