JOIN US
मराठी बातम्या / Viral / ओ दीदी नव्हे...ओ काकू... चार रस्त्यावर काकूंनी अशी पळवली गाडी की थेट गाठलं रुग्णालय

ओ दीदी नव्हे...ओ काकू... चार रस्त्यावर काकूंनी अशी पळवली गाडी की थेट गाठलं रुग्णालय

दिवसाला एक ना एका अपघात घडतच असतो. पण यासंबंधीत कधी कधी काही व्हिडीओ देखील समोर येतात. जे जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद होतात.

जाहिरात

अपघाताचा व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रितम पंडित, प्रतिनिधी सोलापूर, 04 जुलै : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा एका अपघाताचा व्हिडीओ आहे. तसे पाहाता दिवसाला एक ना एका अपघात घडतच असतो. पण यासंबंधीत कधी कधी काही व्हिडीओ देखील समोर येतात. जे जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद होतात. सध्या समोर आलेला व्हिडीओ हा सोलापूरातील असल्याचे समोर येत आहे. यामध्ये स्पीडब्रेकर नसल्यामुळे चाररस्त्यावर एक अपघात घडला ज्यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर कैद झाला आहे. सोलापूर शहरातल्या गजबजलेल्या शिंदे चौकात भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या महिलेने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. शिंदे चौकात एका बाजूने तरुण स्कुटी घेऊन नवी पेठच्या दिशेने चालला होता. मात्र चार मार्ग असलेल्या शिंदे चौकात एका मार्गावरून येणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या स्कुटीवरील काकूंनी धडक दिली. या कांकूंच्या मागे आणखी एक महिला बसली होती. या जोरदार धडकेमुळे दोन्हीही महिला सध्या रुग्णालयात भरती झाल्या आहेत.

खरंतर त्या भागात चारस्ता असला तरी देखील स्पीड ब्रेकर नव्हतं. शिवाय काकूंना वेळेवर गाडी रोखता आली नाही ज्यामुळे त्या समोरील तरुणाच्या गाडीला धडकल्या. आता या दोन्ही महिला जखमी आहेत. हा सर्व प्रकार cctv कॅमेरात कैद झाला आहे. नवी पेठ परिसरातील शिंदे गजबजलेला चौक आहे या ठिकाणी चार मार्ग आहेत शिंदे चौकात गतिरोधक नसल्यामुळे अनेक वाहनांचा अपघात होतात. आता शिंदे चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या