मेट्रोतील भांडण
नवी दिल्ली, 28 जून : मेट्रोमधून दिवसाला अनेक लोक प्रवास करतात. रोज काही ना काही नवी घटना घडत असते. दिल्ली मेट्रोतल्या घटना तर थांबायचं नाव घेईनात. एकापेक्षा एक हटके, विचित्र गोष्टी दिल्ली मेट्रोमध्ये पहायला मिळतात. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये मेट्रोत भांडण पहायला मिळतंय. दोन महिला एका कपलसोबत वाद घालत आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. प्रत्यक्षात हे प्रेमी युगल मेट्रोमध्ये गैरवर्तन करत असल्याचा आरोप दोन महिलांनी लावला. कपलची कृत्ये पाहून महिलांनी त्या जोडप्याला फटकारले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये हे जोडपे आणि दोन महिला एकमेकांशी भिडल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिला म्हणत आहेत की “हे चुकीचे नाही तर दुसरे काय आहे? थोडी तरी लाज वाटली पाहिजे.” तर मुलगा म्हणतो की “आम्हाला लाज का वाटावी? आम्ही काय करतोय?”. तेव्हा मुलगी म्हणाली, “आम्ही फक्त उभे आहोत.” यानंतर महिला म्हणतात की “तो कसा उभा आहे?”. या वादाच्या भरात महिला म्हणाल्या, “तुम्ही लोक खूप उद्धट आहात.” यावर जोडप्याला राग येतो आणि तेही महिलांसोबत वाद घालू लागतात.
महिला कपलच्या उभं राहण्यावरुन चिडल्या. हा वाद जोरदार पेटला. शेवटी मेट्रोतील काही लोकांनी पुढाकार घेत त्यांना थांबवलं. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 14 सेकंदाच्या या व्हिडीओ अनेक कमेंट येत असलेल्या पहायला मिळत आहे. दरम्यान, यापूर्वी मेट्रोतील अशा अनेक निरनिराळ्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लोकांचा संताप होतोय. तरुण तरुणी मेट्रोमध्ये हद्द पार करताना दिसतात. ज्यामुळे नागरिकांनाही याचा त्रास होतो.